पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : भारताचे 117 खेळाडू सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये काही चांगली कामगिरी करत आहेत तर काहींच्या हाती निराशा लागली आहे. अनेक इतिहास काहींनी घडवले आहेत तर मनू भाकर ही पहिले ॲथलेटिक्स ठरली जिने भारतासाठी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवले आहेत. त्याचबरोबर शूटिंगमध्ये आतापर्यत भारताकडे पहिल्यांदा तीन पदक हाती लागले आहेत. तर टेबल टेनिस आर्चरीमध्ये खेळाडू मोठी कामगिरी करू शकले नाहीत. ३ ऑगस्ट रोजी कोणत्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर बाबतीत सविस्तर वाचा.
२५ मीटर पिस्तूल यामध्ये भारताची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारी मनु भाकर तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. शेवटच्या सिरीजमध्ये सामना शूट आउटमध्ये गेल्यानंतर एक शॉटमुळे तिला चौथ्या स्थानावर रहावे लागले.
भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी राऊंड ऑफ १६ मध्ये दमदार कामगिरी करून क्वार्टर फायनल गाठली होती. यामध्ये तिचा सामना कोरियाशी झाला, या सामन्यांमध्ये तिला ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. त्याचबरोबर दुसरीकडे युवा आर्चर भजन कौर हिला राऊंड ऑफ १६ मध्ये एलिमिनेट व्हावे लागले सामन्याच्या शेवटी बरोबरी झाल्यानंतर सामना शूटआउट मध्ये गेल्यानंतर तेथे भजन कौरला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताचा युवा बॉक्सर निशांत देव त्याचा क्वार्टर फायनलचा सामना मध्यरात्री खेळवला गेला. निशांत देवचा सामना मेक्सिकन बॉक्सर झाला यामध्ये त्याला १-४ असा पराभव सामना करावा लागला. या मॅचनंतर अनेक भारतीय खेळाडूंनी अम्पायर्सवर प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण यामध्ये पहिले बाऊट हा निशांतने जिंकला त्यानंतर पुढील दोन्ही बाऊट हे मेक्सिकन बॉक्सरच्या साईडने देण्यात आले.
भारताने आतापर्यत ३ मेडल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले आहेत. यामध्ये भारताची स्टार शुटर मनु भाकरने पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर भारताच्या शूटिंग १० मीटर मिक्स टीमने दुसरे मेडल मनु भाकर आणि सरबजोत सिंह यांना मिळाले. त्यानंतर दुसरे मेडल २५ मीटर रायफलमध्ये स्वप्नील कुसालेने भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे.