Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games: डेहराडूनमध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांचा अचूक नेम; पार्थने पदार्पणातच जिंकले ‘Gold Medal’

किरण जाधव हा सातारा जिल्ह्यातील भाटणवाडी या गावचा खेळाडू असून त्याने सन 2015 मध्ये सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव सुरू केला. या खेळातील त्याची कामगिरी बघून सेनादलात त्याची निवड झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2025 | 05:43 PM
38th National Games: डेहराडूनमध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांचा अचूक नेम; पार्थने पदार्पणातच जिंकले 'Gold Medal'

38th National Games: डेहराडूनमध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांचा अचूक नेम; पार्थने पदार्पणातच जिंकले 'Gold Medal'

Follow Us
Follow Us:

डेहराडून: मराठमोळ्या नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य व कांस्य पदकाच्या कमाई करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेजवर महाराष्ट्राची पताका अभिमानाने फडकवली. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या १० मीटर एअर रायफल्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने या युवा खेळाडूने सोनेरी वेध घेतला, तर जागतिक सुवर्णपदक विजेता रुद्रांक्ष पाटील याने रुपेरी यश संपादन केले. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातील खेळाडू किरण जाधव याला कांस्यपदक मिळाले.

एअर रायफल्स स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत चुरस पहावयास मिळाली. 17 वर्षीय खेळाडू पाथने 252.6 गुण, रुद्रांक्ष याने 252.1 गुण, तर किरणने 230.7 गुणांची नोंद करीत महाराष्ट्राला तिन्ही पदके जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. एका फेरीचा अपवाद वगळता पार्थने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी टिकवत सुवर्ण यश संपादन केले. रुद्राक्ष हा मधल्या टप्प्यात सहाव्या स्थानावर होता. मात्र शेवटच्या चार टप्प्यांमध्ये त्याने एकाग्रता दाखवीत अतिशय अचूक नेम साधले आणि जोरदार मुसंडी मारत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. अर्थात त्याला पार्थ याची आघाडी तोडता आली नाही.

पार्थ हा मूळचा सोलापूरचा खेळाडू असून गेले चार वर्षे तो सुमा शिरूर यांच्या पनवेल येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याने कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत सोनेरी वेध घेतला होता तसेच 2023 मध्ये त्याने सांघिक विभागात भारतात सुवर्णपदक मिळवून दिले होते. तो पनवेल येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे.

हेही वाचा: 38th National Games : खो-खो मध्ये महाराष्ट्र दोन्ही संघांची विजयी घोडदौड; पुरुष व महिला गटात कर्नाटकचा धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत

सोनेरी यशाची खात्री होती : पार्थ

अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर मी फक्त सुवर्णपदक जिंकण्याचाच विचार केला होता त्या दृष्टीनेच सुरुवातीपासूनच मी अचूक नेम कसा साधला जाईल याचे नियोजन केले होते सुदैवाने माझ्या नियोजनानुसारच घडत गेले. या स्पर्धेत प्रथमच भाग घेताना सुवर्णपदक मिळवता आले याचा आनंद मला खूप झाला आहे असे पार्थ याने सांगितले. जागतिक स्पर्धांसाठी होणार्‍या राष्ट्रीय चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेत भारतीय संघात स्थान मिळवण्याचे माझे ध्येय आहे आणि अर्थातच ऑलिंपिक मध्ये प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न आहे ते मी साकार करू शकेन अशी मला आशा आहे असेही पार्थ याने सांगितले.

हेही वाचा: 38th National Games : खो-खो मध्ये महाराष्ट्र दोन्ही संघांची विजयी घोडदौड; पुरुष व महिला गटात कर्नाटकचा धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत

मुंबई येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्‍या रुद्राक्ष याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवीत गतवेळी ऑलिंपिक कोटा मिळविला होता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत. राज्य शासनातर्फे गतवर्षी त्याला शिवछत्रपती पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. मधल्या टप्प्यात सहाव्या क्रमांकावर माझ्यावर थोडेसे दडपण होते तरीही मला पदकाची खात्री होती त्यामुळेच मी शेवटपर्यंत संयम व चिकाटी ठेवीत नेम साधले त्यामुळेच मला रुपेरी कामगिरी करता आली, महाराष्ट्राच्याच पार्थ याला सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे असे रुद्रांक्ष याने सांगितले.

किरण जाधव हा सातारा जिल्ह्यातील भाटणवाडी या गावचा खेळाडू असून त्याने सन 2015 मध्ये सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव सुरू केला. या खेळातील त्याची कामगिरी बघून सेनादलात त्याची निवड झाली. त्याने आतापर्यंत जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याला दोन सुवर्णपदके मिळाली होती.

Web Title: Parth mane won gold medal at 10 meter air rifiles dehradun at 38 th national games competition sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • 38th India National Games

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.