फोटो सौजन्य - X
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामना रद्द : पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये सामना सुरू होता. परंतु सामना आज पावसामुळे उशिरा सुरू झाला आजच्या पहिल्या डावात दहा ओव्हरचा खेळ झाला आणि त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. आजचा सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने फलंदाजी दमदार गेली होती. धर्मशाला येथे पंजाब किंग्सचा सामना सध्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होत आहे. या सामनाची सुरुवातच आज पावसाने झाली त्यामुळे नाणेफेक सुरू व्हायला उशीर झाला आणि सामना सुरू होण्यासाठी देखील लेट झाले.
आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरणे नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याला चांगलाच फायदेशीर ठरला आणि संघाने दमदार सुरुवात केली. आजचा सामन्यात पंजाब किंग्सचे सलामी वीर फलंदाज प्रभसीमरण सिंग आणि प्रियांश आर्या या दोघांनी अर्धशतकीय खेळी खेळणी आणि शतकीय भागीदारी केली चा फायदा संघाला झाला आणि संघाने मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरले. अच्छा पहिला डावात खेळाडूंची कशी कामगिरी राहिली या संदर्भात सविस्तर वाचा.
🚨 The match between Punjab Kings and Delhi Capitals has been called off in Dharamsala.#IPL2025 #IPL #PBKSvDC #Dharamsala pic.twitter.com/GpmkdTWy1K
— Circle of Cricket (@circleofcricket) May 8, 2025
पंजाब किंग्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर प्रिया आर्याने अर्धशतकीय खेळी खेळली. आजच्या सामन्यात त्याने 34 चेंडूंमध्ये 70 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्याने सहा षटकार आणि पाच चौकार मारले. त्यानंतर टी नटराजन या नेत्याला बाद केले. आजच्या सामन्यात टी नटराजन याने 11 व्या ओव्हरमध्ये विकेट घेतली.
भारत आणि पाकिस्तान विरूध्द यांच्यामध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. झालेल्या सिंधुर ऑपरेशननंतर आता पाकिस्तानने हल्ला भारतावर केला आहे. धर्मशाळेतील खेळाडू, कर्मचारी आणि प्रसारण पथकाला बाहेर काढण्यासाठी बीसीसीआय उद्या उना येथून विशेष ट्रेनची व्यवस्था करणार आहे. मैदान रिकामे करण्यात आले आहे आणि आयपीएलबाबत उद्या निर्णय घेतला जाईल.
🚨 UPDATE ON IPL 🚨
BCCI to arrange special train from Una to evacuate players, staff & broadcast crew tomorrow from Dharamsala.
– The ground has been evacuated & a call on the IPL will be taken tomorrow.
Players safety will not be compromised. #PBKSvDC pic.twitter.com/5Q1wHIhpCz
— Dinesh Verma (@DineshVerm1047) May 8, 2025
आयपीएल 2025 चे सामने आता होणार कि नाही यासंदर्भात अजुनपर्यत भारतीय नियामक मंडळाने निर्णय घेतला नाही त्यासंदर्भात माहीती मिळताच तुमच्यापर्यत पोहोचवली जाईल.