फोटो सौजन्य - Punjab Kings/Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स : धर्मशाला येथे आज अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्यामधील लढत पाहायला मिळणार आहे. मागील सामना दिल्लीचा पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आजचा सामना त्यांना जिंकणे गरजेचे आहे. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सचा संघ सध्या चांगला फॉर्ममध्ये आहे त्यांचा देखील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एक सामना पावसामुळे रद्द झाला होता मागील दोनही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे त्यामुळे आजच्या सामन्यावर विजय मिळवून प्लेऑफचे स्थान पक्के करेल.
अक्षर पटेलचा संघ दिल्ली कॅपिटल्सला मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सध्या संघ पाचव्या स्थानावर आहे त्यामुळे त्यांना प्ले ऑफ मध्ये जायचे असल्यास त्यांना हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. पंजाब किंग्सचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे सध्या संघाचे 15 गुण आहेत आजच्या सामन्यात विजय मिळाल्यास संघ पहिल्या स्थानावर जाईल आणि प्ले ऑफचे स्थान जवळजवळ पक्के करेल.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bat against @DelhiCapitals in Match 5⃣8⃣.
Updates ▶️ https://t.co/R7eQDiYQI9 #TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/xTJQwODUnL
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2025
आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघामध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दोन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये विप्रज निगम आणि करुण नायर यांना आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. या दोघांच्या स्थानावर माधव तिवारी आणि समीर रिझवी यांना आजच्या संघामध्ये स्थान मिळाले आहे.
IPL 2025 : पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामना धर्मशाला येथे होणार नाही, बीसीसीआयने ठिकाण बदलले
मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. तर श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर आज चाहत्यांची नजर असणार आहे. प्रभसिमरन सिंह सध्या दमदार फॅार्ममध्ये आहे तो आज कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), जाॅश इंग्लिश, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, नेहल वढेरा, मार्काे यान्सन, अजमतुल्लाह उमरजाई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह
इम्पॅक्ट प्लेयर – विजयकुमार वैशांक, हरप्रीत ब्रार, यश ठाकुर, प्रवीण दुबे, सुर्यांश शेडगे
फाफ डूप्लेसी, केएल राहुल, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, दुश्मंता चमिरा, कुलदीप यादव, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेयर – आशुतोष शर्मा, जेक-फ्रेजर-मैक्गर्क, मुकेश शर्मा, विप्रज निगम