PBKS vs GT: 'A beautiful match of short pitch balls..'; Kane Williamson heaps praise on Shreyas Iyer, impressed by his batting..
PBKS vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स समोरासमोर उभे ठाकले होते. या रोमांचक सामन्यात पंजाबने रोमहर्षक विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूपच अतिटतीचा झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. एकेकाळी हा सामना जीटी घेऊन जाणार असे वाटत होते. पण, ऐनवेळी अय्यरचे कर्णधारपदाचे नेतृत्व आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि पंजाब किंग्स विजयी झाला. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजीचा नजारा सादर केला. त्याने 42 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि तब्बल 9 षटकार लागवले.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये सतत आपल्या खेळात सुधारणा करता आला आहे. शॉर्ट पिच बॉल्स खेळण्यासारख्या आव्हानांशी त्याने आता चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले आहे, असे न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू केन विल्यमसनचे मत आहे. अय्यरने मंगळवारी येथे गुजरात टायटन्सविरुद्ध 42 चेंडूंत नऊ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 97 धावांची सामना जिंकून देणारी खेळी खेळली. त्याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा : PBKS vs GT : शशांक सिंगचा रुद्रावतार, एकाच षटकात लगावले पाच चौकार; सिराजच्या गोलंदाजीची काढली पिसे..
विल्यमसनने जिओ स्टारसोबत बोलताना सांगितले की, ‘श्रेयस अय्यरची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने आपल्या खेळात केलेली सुधारणा होय. एकेकाळी त्याला शॉर्ट पिच बॉल्सचा सामना करावा लागत असताना कठीण जात होते. पण, त्याने त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले आहे. त्याच्या पुढच्या पायावर वजन टाकून त्याने शॉर्ट पिच बॉल्सचा सुंदरप्रकारे सामना केला आहे.’
तसेच तो पुढे म्हणाला की, ‘ त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पुढच्या पायावर वजन देत पटकन हस्तांतरित करण्याची क्षमता, ज्यामुळे त्यामुळे समोरच्या गोलंदाजांच्या अडचणीत वाढ होते. ते लहान तर कधी पूर्ण लांबीची गोलंदाजी करतात. तो मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारण्यास सक्षम आहे, ज्यामुळे तो खूप मजबूत फलंदाज म्हणून पुढे येतो.’
हेही वाचा : PBKS vs GT : अर्शदीपचा चेंडूला जादुई स्पर्श अन् Rahul Tewatia धावबाद, तिथेच पंजाबच्या विजयाचे उघडले दरवाजे..
विल्यमसन म्हणाला की, गुजरात टायटन्सविरुद्ध अय्यरची 97 धावांची नाबाद खेळी ही अतुलनीय अशीच आहे. तसेच ही उच्च दर्जाची खेळी होती. पहिल्या चेंडूपासूनच त्याने वर्चस्व गाजवले आहे. त्याला जिथे मारायचे होते तिथे तो चेंडू खेळला आहे.’ असेही विल्यमसन म्हणाला.
कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत त्याने 42 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि तब्बल 9 षटकार लागवले. असे असताना देखील पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला आपले शतक पूर्ण करता आले नाही. अवघ्या 3 धावांनी त्याचे शतक हुकले. श्रेयस अय्यरने आपल्या शतकाची चिंता न करता शशांक सिंगला कोणतीही चिंता न करता खेळण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर शशांकने दमदार फलंदाजी करत पंजाबजची धावसंख्या 243 धावांपर्यंत नेली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला 20 षटकांत केवळ 232 धावाच करता आल्या आणि त्यांना 11 धावांनी पराभव पत्करावा लागला.