PBKS vs GT : अर्शदीपचा चेंडूला जादुई स्पर्श अन् Rahul Tewatia धावबाद, तिथेच पंजाबच्या विजयाचे उघडले दरवाजे..(फोटो-सोशल मीडिया)
PBKS vs GT : आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज ने गुजरात टायटन्सला।पराभूत करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. पंजाबने हा सामना ११ धावांनी आपल्या नावे केला. श्रेयस अय्यरच्या 97 धावांच्या जोरावर 234 धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने कडवी झुंज दिली. या सामन्यादरम्यान राहुल तेवतिया फलंदाजीला आला. त्याचा रेकॉर्ड बघता तेवतीया सहज सामना काढेल. परंतू, तेवतीया दुर्दैवीपणे धावबाद झाला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 244 धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरात संघाने हे या लक्षाचा पाठलाग करत कडवी झुंज दिली. मात्र त्यांना सामना जिंकण्यात अपयश आले. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने 97 धावांची वेगवान खेळी केली. याशिवाय प्रियांश आर्यने देखील आपल्या डेब्यू सामन्यात 47 धावा कुटल्या. तसेच ऐनवेळी शशांक सिंगने फटकेबाजी करत 44 धावा केल्या.
झालं असं की, प्रतिउत्तरात जीटीने प्रयत्नांची सजरडथ केली परंतु जीटीला विजय मिळवता आला नाही. त्यात जीटीला गरज असताना विकेट गेल्यावर राहुल तेवतीया मैदानात आला. तेव्हा त्याने एक षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. परंतु, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर शेरफेन रदरफोर्डने जोरदार फटका मारला आणि तो चेंडू सरळ समोरच्या यष्टीच्या दिशेने गेला तेवढ्यात अर्शदीपने चेंडूला स्पर्श केला. तो चेंडू अर्शदीपच्या बोटांना स्पर्श करून थेट गोलंदाजाच्या टोकावरील स्टंपवर जाऊन आदळला. स्ट्राईक परत घेण्याचा प्रयत्न करताना तेवतिया क्रीजच्या बाहेर आला होता. त्यात त्याचा बळी गेला आणि जीटीच्या विजयाचा दरवाजा बंद झाला.
पीबीकेएसने पहिल्या डावात 243 धावा केल्या होत्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 97, शशांक सिंग 44 धावा आणि प्रियांश आर्यने 47 धावांची भर घालत शानदार खेळी केली. त्यामुळे पंजाबला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. जीटीकडून साई किशोरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जीटी केवळ 232 धावापर्यंतच मजल मारू शकला.
हेही वाचा : PBKS vs GT : शशांक सिंगचा रुद्रावतार, एकाच षटकात लगावले पाच चौकार; सिराजच्या गोलंदाजीची काढली पिसे..
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.