शशांक सिंग आणि मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मिडिया)
GT vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर रोमांचक विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूपच अतिटतीचा झालेला बघायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. एकेकाळी हा सामना जीटी घेऊन जाणार असे वाटत असतानाच अय्यरचे कर्णधारपद आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि पंजाब किंग्स विजयी झाला. या दरम्यान एक खेळाडू खास लक्षात राहिला तो म्हणजे शशांक सिंग. त्याने शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची पिसे काढली.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने गुजरातसमोर 244 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा संघ 232 धावांवर गारद झाला. या सामन्यात पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 97 धावांची खेळी केली. दुसरीकडे, फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या शशांक सिंगने अवघ्या 16 चेंडूत 44 धावा चोपल्या. यामुळेच पंजाबचा संघ स्कोअर बोर्डवर 243 धावा लावू शकला.
हेही वाचा : Suryakumar Yadav : मिस्टर 360 ने मुंबईत खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट; किंमत वाचून भरेल धडकी..
शशांक सिंगने अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजवर हल्लाच केला. या षटकात त्याने पाच चौकार लगावले यानी सिराजची हवाच काढून घेतली. त्यामुळेच गुजरातविरुद्ध पंजाबला एवढी मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. शशांकने अवघ्या 16 चेंडूत नाबाद 44 धावा कुटल्या. तर दुसरीकडे, अय्यरने देखील गोलंदाजांची पर्वा न करता आक्रमण सुरूच ठेवले. त्याने केवळ 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर देखील त्याने थांबायचे घेतले नाही. अर्धशतकानंतरही त्याने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पण मात्र अवघ्या 3 धावांनी अय्यरचे शतक हुकले.
हेही वाचा : Tamim Iqbal Health Update : तमीम इक्बालसाठी पुढील 72 तास धोक्याचे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू…
पंजाब किंग्ज संघातील विजय कुमारने शानदार गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले. विशेषत: त्याने 15 व्या आणि 17व्या षटकात त्याने आपला जलवा दाखवला. विजय कुमारने 15 व्या आणि 17 व्या षटकात प्रत्येकी केवळ 5-5 धावा दिल्या. त्यामुळे गुजरात टायटन्स संघ आवश्यक निव्वळ रनरेटपासून दूर फेकला गेला. गुजरातकडून साई सुदर्शनने फलंदाजीत सर्वाधिक 74 धावा केल्या. यानंतर जोस बटलरने 54 धावांची तर शर्फन रदरफोर्डने 46 धावांची वेगवान खेळी सकारली मात्र ते विजया पर्यंत पोहचवू शकले नाही.
कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली. त्याने 42 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि तब्बल 9 षटकार लागवले. असे असताना देखील पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आपले शतक पूर्ण करू शकला नाही. अवघ्या 3 धावांनी त्याचे शतक हुकले. अय्यरला शेवटच्या षटकांमध्ये स्ट्राईक मिळू शकला नाही. शशांक सिंगने शेवटच्या षटकात वादळी खेळी केली. सिराजच्या शेवटच्या षटकात त्याने 23 धावा कुटल्या.