फोटो सौजन्य : IndianPremierLeague
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स सामन्याचा अहवाल : पंजाब किंग्सचा सामना आज जयपुरमध्ये मुंबई इंडीयन्स विरुद्ध झाला, या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवुन दिला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे त्यांना ते महागात पडले. आजच्या सामन्याचे जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता त्यामध्ये मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स कमावून 20 ओवर मध्ये 184 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सच्या संघाने मुंबई इंडियन्सला जयपूरच्या मैदानावर 8 विकेट्सने पराभूत केले.
पंजाब किंग्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाने फक्त एक विकेट आज गमावला तो म्हणजेच प्रभसिमरन सिंहचा. प्रभसिमरण सिंह याने आज त्याची विकेट लवकर गमावली आणि त्याने 16 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या आणि त्यानंतर त्याने विकेट गमावली. त्यानंतर जोश इंग्लिश फलंदाजीला आला आणि प्रियांश आर्या याला चांगली साथ मिळाली. प्रियांश आर्याने आज आणखी एक ज्ञान दमदार खेळी खेळली आणि चाहत्यांना प्रभावित केले. त्याने आजच्या सामन्यात 35 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या आणि यामध्ये त्याने 2 षटकारही मारले त्याचबरोबर 9 चौकार मारले.
जोश इंग्लिश याने आजच्या सामन्यात मॅच विनिंग खेळली. त्यांनी या सीजन मधील त्याचे पहिले अर्धशतक ठोकले. जोश इंग्लिश याने 42 चेंडू मध्ये 73 धावा केल्या यामध्ये त्याने तीन षटकार मारले आणि नऊ चौकार मारले. आजच्या सामन्या त्याने 173 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. श्रेयसने आजच्या सामन्यात 16 चेंडूमध्ये 26 धावा केला यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार मारला.
Punjab Kings move to the top of the table and seal a spot in Qualifier-1! 🔥
A dominant win for Shreyas Iyer & Co. against MI! 💪❤️#IPL2025 #PBKSvMI #Sportskeeda pic.twitter.com/rgcwCiZQh9
— Sportskeeda (@Sportskeeda) May 26, 2025
मुंबईच्या संघासाठी आज फक्त सुर्यकुमार यादव याने संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने आजच्या सामन्यामध्ये आणखी एकदा कमालीची कामगिरी केली. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाविरुद्ध सुर्यकुमार यादवने 39 चेंडुमध्ये 57 धावा केल्या. तर रोहित शर्माच्या बॅटने या सामन्यात फक्त 24 धावा आल्या. तर हार्दिकने 26 धावा केल्या आणि विकेट गमावली. 20 धावा नमन धीरच्या बॅटने आल्या. 27 धावा संघाचा सलामीवीर फलंदाज रायन रिकल्टन याने केले. इतर तिलक वर्मा, विल जॅक्स आजच्या सामन्यात फेल ठरला.