PBKS vs RCB Final Match: 'First pay off the bank loan..', Vijay Mallya's incredible insult while congratulating RCB..
PBKS vs RCB Final Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवार, ३ जून रोजी पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अशातच माजी फ्रँचायझी मालक विजय मल्ल्याने संघाला चॅम्पियन झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या दरम्यान लोकांनी मल्ल्याला फटकारले असून त्याची खूप मजा उडवली आहे. यूजर्स म्हणाले की, फरार मल्ल्याने भारतात परतावे आणि कर्ज फेडण्यासाठी एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाला भेटायला जावे.
विजय मल्ल्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, “आरसीबी अखेर १८ वर्षांनी आयपीएल चॅम्पियन बनला आहे. २०२५ च्या स्पर्धेतील मोहीम शानदार होती. उत्कृष्ट कोचिंग आणि सपोर्ट स्टाफसह संतुलित संघाने शानदार कामगिरी केली. खूप खूप अभिनंदन! हा साला कप नमस्ते!!”
मल्ल्याच्या या पोस्टवर एका वापरकर्त्याने लिहिले की, किमान आता तरी कर्ज परत करा. तसेच एसबीआयचे पैसे परत करा. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, आता एसबीआयची प्रतीक्षा एकदाची संपवा. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, आता एसबीआयचे पैसे परत करा. तसेच एका युजरने लिहिले की, भारतात परतण्याची वेळ झाली आहे… तुम्ही कधी येत आहात?
RCB are IPL Champions finally after 18 years. Superb campaign right through the 2025 tournament. A well balanced team Playing Bold with outstanding coaching and support staff. Many congratulations ! Ee sala cup namde !!
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 3, 2025
तसेच एका युजरने लिहिले आहे की, “आरसीबीने आयपीएल जिंकले, आता तुम्ही या, किती काळ पळून जाणार आहात.” तर एका युजरने गांतीशीर लिहिले आहे, “तुम्ही भारतात कधी येणार, एसबीआय खूप आनंदी होणार. किमान तुम्ही जिंकलेल्या रकमेचे पैसे परत कराल, आता बाहेर या, मी अजूनही वाट पाहत आहे.”
RCB are IPL Champions finally after 18 years. Superb campaign right through the 2025 tournament. A well balanced team Playing Bold with outstanding coaching and support staff. Many congratulations ! Ee sala cup namde !!
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 3, 2025
हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : बेंगळुरूमध्ये निघणार विजयी रथ: RCB ‘असा’ साजरा करेल पहिल्या ट्रॉफीचा आनंद..
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता ठरला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.