RCB च्या विजयी टीमचे ट्रॉफीसह भव्य स्वागत(फोटो-सोशल मीडिया)
RCB IPL winning rally : काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. विजयानंतर संघ बुधवारी दुपारी बेंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर आला तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांनी आरसीबी संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांची देखील रस्ता मोकळा करताना दमछाक झाली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघ विमानतळावर पोहचताच राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.
संघ विधान सौधाकडे जात असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांकडून संघाला जोरदार प्रोत्साहन देण्यात आले. जल्लोषाचे वातावरण सगळीकडे दिसून येत होते. त्यानंतर बेंगळुरूच्या विजयी आनंदाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
मंगळवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव करून आरसीबीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पहिले आयपीएल टायटल आपल्या नावे केले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर, आरसीबीचे खेळाडू चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहचणार आहेत. जिथे ते चाहत्यांना संबोधित करण्यासोबतच ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करणाराहेत.
गुरुवारी बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, वाहतूक समस्येमुळे बहुप्रतिक्षित ओपन-रूफ बस परेड विधान सौधा ते स्टेडियमपर्यंत होणार नाही.
WHAT A WELCOME FOR RCB IN BENGALURU. pic.twitter.com/8KFfcxiWj4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025
हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : बेंगळुरूमध्ये निघणार विजयी रथ: RCB ‘असा’ साजरा करेल पहिल्या ट्रॉफीचा आनंद..
हा ऐतिहासिक कार्यक्रम सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था आखण्यात आली आहे. ज्यामध्ये ३ पोलिस उपायुक्त (डीसीपी), ९ सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), १२ निरीक्षक आणि विशेष वाहतूक पोलिस दल तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन सुरळीतपणे करता यावे म्हणून सीटीओ जंक्शन आणि कॉफी बोर्ड जंक्शनभोवती वाहतूक निर्बंध लादण्यात येणारासल्याचे बोलले जात आहे.
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता ठरला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.