PCB Chairmans big revelation about Pakistan cricket stadium
PCB Chairmans Big Revelation about Pakistan Cricket Stadiums : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्राॅफफीबद्दल मोठा खुलासा करताना, पाकिस्तानमधून स्पर्धा काढून टाकण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु भारत या स्पर्धेसाठी प्रवास करेल की नाही याबद्दल शंका आहे. असे म्हटले आहे. तर पाकिस्तानातील स्टेडियमची निश्चितच दुरावस्था आहे त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या दर्जाचे स्टेडियम बनवण्याकरिता आम्हाला यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तानने जवळपास एका दशकात एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि येथील स्टेडियममध्ये मोठी तफावत असल्याची कबुली दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पीसीबीची जबाबदारी असल्याचे नक्वी यांनी मान्य केले. त्यांनी अलीकडेच लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमला भेट दिली आणि संपूर्ण स्टेडियमचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यास बोर्डाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले.
आमचा प्रयत्न राहील, येथील स्टेडियम सुसज्ज बनवावे
मोहसीन नक्वी म्हणाले, आमची स्टेडियम आणि बाकी जगातील स्टेडियममध्ये खूप फरक आहे. ते कोणत्याही अर्थाने आंतरराष्ट्रीय स्टेडियम नव्हते. एकही स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिसले नाही. तिथे जागा नव्हती, स्नानगृह नव्हते आणि 500 मीटरच्या त्रिज्यातून सामना पाहत असल्यासारखे दृश्य होते. पीसीबी प्रमुखांनी असेही सांगितले की त्यांना आशा आहे की गद्दाफी स्टेडियम पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मार्की सामने आयोजित करेल. संघांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जवळपास हॉटेल बांधण्याच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हे काम वेळेत पूर्ण होईल, याची खात्री झालेली नाही.
आमचे स्टेडियम जगातील सर्वोत्तम स्टेडियम बनवू
ते म्हणाले, ‘फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशन (FWO) ची टीम रात्रंदिवस काम करत आहे. आम्ही आमचे स्टेडियम जगातील सर्वोत्तम स्टेडियम बनवू. स्टेडियममध्ये मूलभूत सुविधा पुरविणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. PCB ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी तीन मुख्य केंद्रांवर क्रिकेट स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी अंदाजे 17 अब्ज रुपये पाकिस्तानी रुपये दिले होते. मोहसीनने स्वत: नुकतीच गद्दाफी स्टेडियमला भेट देऊन कामाची पाहणी केली. यंत्रसामग्री वाढवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केली जाऊ शकते. पीसीबीने यासाठीचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे.
चॅम्पियन्स ट्राॅफी काढण्याबाबत कोणताही निर्णय नाही
पाकिस्तानमधून स्पर्धा काढून टाकण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु भारत या स्पर्धेसाठी प्रवास करेल की नाही याबद्दल शंका आहे. भारत आणि पाकिस्तानने जवळपास एक दशकात द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही, परंतु पाकिस्तानने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात प्रवास केला होता. आशिया चषक 2023 प्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात हे देखील समोर आले आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.