Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्डकप
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएनबीकडून ऑलिंपियन अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान; हॉकी आशिया कपमधील कामगिरीचे केले कौतुक    

भारतातील  पंजाब नॅशनल बँकेने हॉकी आशिया कपमधील शानदार कामगिरी केल्याबद्दल भारताचे दोन हॉकी स्टार्स अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 10, 2025 | 06:09 PM
PNB honours Olympians Abhishek and Sukhjit Singh; praises their performance in Hockey Asia Cup

PNB honours Olympians Abhishek and Sukhjit Singh; praises their performance in Hockey Asia Cup

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतातील  पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) भारताचे दोन हॉकी स्टार्स ऑलिंपियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान करण्यासाठी एक विशेष सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिषेक यांना अलीकडेच आशिया चषक 2025 मध्ये “टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू” म्हणून निवडण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू पीएनबीचे कर्मचारी तसेच पीएनबी हॉकी संघाचे वरिष्ठ सदस्य आहेत. बँक हॉकीतील प्रतिभावान खेळाडू घडवण्यासाठी एक हॉकी अकादमीही चालवते.

हा समारंभ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, जिथे पीएनबीचे एमडी आणि सीईओ अशोक चंद्र यांक्याकडून खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दोन्ही हॉकी विजेत्यांसोबत एक संवादात्मक सत्रदेखील आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा : Asia Cup 2025 : हाँगकाँगविरुद्ध azmatullah omarzai च्या नावे विक्रमाची नोंद! असे करणारा अफगाणिस्तानचा ठरला पहिलाच खेळाडू

पॅरिस 2024 चे ऑलिंपियन, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे रौप्यपदक विजेते, आशियाई खेळ 2022 चे सुवर्णपदक विजेते आणि आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चेही सुवर्णपदक विजेते असलेले अभिषेक भारताच्या सर्वात गतिमान (डायनॅमिक) फॉरवर्ड खेळाडूंमध्ये उभे राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2025 मध्ये ‘टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू’ हा किताब पटकावणाऱ्या अभिषेक यांनी आपल्या दमदार कामगिरीने भारतीय हॉकीचा गौरव वाढवण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे.

पॅरिस 2024 चे ऑलिंपियन, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे रौप्यपदक विजेते, आशियाई खेळ 2022 चे सुवर्णपदक विजेते आणि सलग दोन आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी (2023 आणि 2024) मध्ये सुवर्णपदक मिळवणारे सुखजीत यांनी राष्ट्रीय संघासाठी एक विश्वासार्ह स्ट्रायकर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण गोल करण्याच्या क्षमतेने आणि दृढ निश्चयाने भारताच्या आशिया चषक 2025 मधील विजयात मोलाचा वाटा उचलला.

हेही वाचा : Asia cup 2025 : UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने फोडली ‘डरकाळी’; केली षटकरांची आतिषबाजी..

सन्मान समारंभात बोलताना पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चंद्र म्हणाले की, “आमच्या हॉकी स्टार्सच्या यशाचा उत्सव साजरा करताना पीएनबीला खूप अभिमान वाटतो आहे. आशिया चषकात अभिषेक आणि सुखजीत यांनी जे यश मिळवले, ते त्यांच्या कौशल्याचे, चिकाटीचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने केवळ भारतीय हॉकीच नव्हे, तर संपूर्ण पीएनबी कुटुंबाचा सुद्धा सन्मान वाढवला आहे. आम्ही त्यांचा सन्मान करून स्वतःला गौरवान्वित समजतो आणि भारतीय क्रीडा क्षेत्र तसेच खेळाडूंच्या पाठिंब्याची आमची कटिबद्धता पुन्हा एकदा दृढ करतो.”

Web Title: Pnb honours olympians abhishek and sukhjit singh for their brilliant performance in hockey asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 06:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.