अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs UAE : आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानकडून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली आणि आशिया कपमध्ये विजयी सुरवात केली. या यानंतर आज १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. परंतु, भारत यूएईला कमी लेखणार नाही. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने सरावा दरम्यान आपला दम दाखवून दिल आहे. त्यामुळे आता यूएई संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा : IND vs UAE: यूएईच्या कर्णधाराने भरली ‘हुंकार’; ‘सूर्यकुमार ब्रिगेड’ला हरवण्याची रणनीती तयार, म्हणाला…
भारतीय संघ आज यूएई संघसोबत दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच भारतीय स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने आशिया कप २०२५ च्या तयारीचे एक उत्तम उदाहरण सेट केले आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी पर्यायी सराव सत्रामध्ये त्याने नेट गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
एका वृत्तांनुसार, अभिषेक शर्माने या दरम्यान सुमारे २५ ते ३० षटकार लगावले आहेत. ज्यामुळे त्याच्या देहबोलीत मोठा आत्मविश्वास जागृत झाल्याचे दिसत होते. सराव दरम्यान तो संघाचा मुख्य आकर्षण खेळाडू बनला होता. शर्मा फलंदाजी करतेवेळी उत्कृष्ट लयीत असल्याचे दिसून आले. तो मोठ्या आत्मविश्वाने प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर टोलवले.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.
मुहम्मद वसीम (कर्णधार), मुहम्मद जोहैब, आसिफ खान, आलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), हर्षित कौशिक, हैदर अली, मुहम्मद फारूख, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग, एथन डिसोझा, ध्रुव पराशर, मुहम्मद जवादुल्ला, आर्यनश शर्मा, सागिरुल्ला खान (विकेटकीपर), सागिर खान (विकेटकीपर).