LSG Vs PBKS: 'My goal is to play for India..', Prabhsimran Singh, who played a stormy innings against LSG, expressed his desire...
LSG Vs PBKS : आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम चांगलाच रंगला आहे. आता गुणतालिकेतही संघामध्ये लागलेली चढाओढ दिसून येत आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा दणदणीत पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसरा पराभव ठरला आहे . लखनऊने दिलेले 172 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात प्रत्युत्तरात पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने वादळी खेळी केली. त्याने 34 चेंडूत 69 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार लागावले. त्याने लखनौसाठी सर्वात वेगवान अर्धशतक (23 चेंडूंवर) करण्याचा विक्रम देखील केला आहे. सामन्यानंतर प्रभसिमरन सिंग नेमकं काय म्हणाला जाणून घेऊया.
पंजाबचा सलामीविर प्रभसिमरन सिंगला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आनंदा गगनात मावेनासा झाला. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, आम्ही आमच्या संघाच्या बैठकीत नेहमीच सकारात्मक बोलत असतो. मला संघासाठी नेहमीच खुलेपणाने खेळण्यास सांगितले आहे. जर मी एकदा सेट झालो तर मी विकेट फेकण्यापासून वाचण्याच्या जास्त प्रयत्नात असतो. त्याच्या शॉट्सबाबत प्रभासिमरन म्हणाला की, मी त्यांच्यासाठी खूप सराव केला आणि त्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे आज त्यांच्यापैकी काही शॉट्स माझ्या बॅटमधूनही आलेअ आहेत.
प्रभासिमरन प्रशिक्षक पाँटिंगबद्दल बोलताना म्हणाला की, सर्वांना माहीत आहे की, तो एक महान खेळाडू आहे. तो नेहमीच खूप सकारात्मक असतो. तो जास्त विचार करत नाही. त्याने आम्हाला आपापल्या खेळाला पाठिंबा देण्यास सांगितले आहे. नेटमध्ये अनेक शॉट्सचा सराव केला आहे. हे एक व्यासपीठ आहे जे तुम्हाला भारतासाठी खेळण्याचे तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते.
हेही वाचा : LSG vs PBKS : निकोलस पूरनला बाद करताच चहलचा सुटला ताबा! केली हीन भाषेत टिप्पणी, पाहा Video
पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंहने एलेसजीने दिलेल्या 172च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 69 धावांची वेगवान खेळी केली. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 9 चौकार ठोकले. ज्यामध्ये त्याने लगान चित्रपटाप्रमाणे एक चौकार देखील मारला होता. 8 व्या षटकात रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर फुल टॉस बॉलवर स्कूप शॉट खेळून त्याने चौकार लगावला. हा शॉट हुबेहुब लगान चित्रपटासारखा दिसून येत होता. याबाबतचा उल्लेख समालोचकांनी देखील केला होता.