विराट कोहली आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना बुधवार, 2 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज घरच्या मैदानावर आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे बंगरुळू आज विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. यापूर्वी बेंगळुरूने आपला पहिला सामना कोलकात्यात आणि दुसरा सामना चेन्नईत खेळला होता यानी सामन्यात आरसीबीने विजय मिळवला होता. आरसीबीने सलग दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे.
मुंबईविरुद्ध विजय मिळवल्यावर आज गुजरात टायटन्सचा बंगळुरूमध्ये आरसीबीसोबत सामना रंगणार आहे. गुजरात संघ बेंगळुरूमध्ये विजयी मोहीम कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानाची खेळपट्टी सर्वसाधारणपणे फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. या स्टेडियमचे वेगवान आऊटफिल्ड आणि लहान चौकार त्यांना साथ देणारे ठरतात. त्यामुळे आज अनेक चेंडू हे सीमारेषेबाहेर जाण्याची शक्यता आहे. हा सामना उच्च स्कोअरिंग सामना होण्याची शक्यता नकरता येत नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरसीबीने 3 सामने आपल्या नावावर केले आहेत. तर गुजरातने दोन सामन्यात विजय प्राप्त केला आहे. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये 2 सामने झाले होते. दोन्ही सामन्यात आरसीबीने बाजी मारली.
हेही वाचा : Bcci central contract : बीसीसीआयचा मोठा फैसला! अय्यरला मोठी भेट तर विराट, रोहितचा राखला सन्मान..
आयपीएलच्या इतिहासात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 41 सामने आपल्या नावे केले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 50 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर लीगची सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यात आली होती. सनरायझर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध 287 धावा केल्या होत्या. या स्टेडियमची सर्वात कमी धावसंख्या 82 धावांची नोंदवण्यात आली आहे.
आरसीबीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, रशीद खान, राहुल तेवतिया, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज.