
IPL 2026 Mini Auction: Something happened for the first time in IPL history! Prashant Veer and Kartik Sharma achieved a remarkable feat.
IPL 2026 Mini Auction : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक घटना घडली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा प्रशांत वीर आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात जोरदार बोलीचा विषय गाजला. दोन्ही फ्रँचायझींनी जोरदार बोली लावली, परंतु चेन्नई सुपर किंग्जने अखेर त्याला १४.२० कोटी रुपयांना त्यांच्या संघात दाखल झाला आहे. या खरेदीसह, प्रशांत वीर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये
कार्तिक शर्माला देखील सीएसकेने १४.२० कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले. कार्तिक शर्माला देखील तेवढीच रक्कम १४.२० कोटी रुपये मिळाले. या खेळाडूला देखील चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले. राजस्थानकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिक शर्मालाही मिनी लिलावात बोली लागली. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने देखील त्याच्यासाठी बोली लावली. पण शेवटी, चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारून त्याला ₹१४.२० कोटींना संघात समाविष्ट केले, ज्यामुळे तो हंगामातील सर्वाधिक मूल्यवान खेळाडू ठरला आहे.
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात, प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी इतिहास घडवला आहे. ते आता आयपीएलमधील सर्वात महागडे भारतीय अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. इतर कोणत्या देखील खेळाडूने इतक्या मोठ्या रकमेची कमाई केलेली नाही. चेन्नई सुपर किंग्जने या दोन्ही खेळाडूंवर महत्त्वपूर्ण बोली लावली. आयपीएल २०२६ मधील त्यांची कामगिरी येत्या काळात सगळ्यांना कळणारच आहे.
आयपीएल २०२६ चा लिलावामध्ये फ्रँचायझींनी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनसाठी मोठी बोली लावण्यात आली आणि शेवटी, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ₹२५.२० कोटींना त्यांच्या संघात समाविष्ट करून घेतले. ग्रीन आता लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक बनला.
लिलावात ग्रीनचे नाव समोर येताच, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार स्पर्धा रंगली. त्यानंतर लवकरच चेन्नई सुपर किंग्ज देखील या शर्यतीत सामील पुढे आले, अखेर केकेआरने बोली जिंकली आणि ग्रीनला विकत घेण्यात यश आले.