
He's back! Get ready to hear, 'Mahi is hitting!' MS Dhoni starts practicing for IPL 2026; VIRAL VIDEO
MS Dhoni starts preparations for IPL 2026 : सध्या महिला प्रीमियर लीग २०२६ चा धुमाकूळ सुरू आहे. ही स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. तसेच त्यानंतर ७ फेब्रुवारीपासून पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ स्पर्धेचे देखील वेध लागले आहेत. सर्व संघांकडून २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगसाठी तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज कर्णधार आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव देखील सुरू केला आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.
महेंद्रसिंग धोनीने त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन (जेएससीए) च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलकडून धोनीचा पॅड घालून बॅट उचलतानाचा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याला “जेएससीएचा अभिमान” असे महतेल असून पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “बघा कोण परत आले आहे. जेएससीएचा अभिमान: महेंद्रसिंग धोनी.”
हेही वाचा : IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान
क्लिपमध्ये, धोनीला माजी क्रिकेटपटू आणि झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव सौरभ तिवारी यांच्याशी नेटची तयारी करत असताना गप्पा मारताना दिसत आहे. धोनी सध्या झारखंड क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मिळून काम करत आहे. झारखंडने अलिकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. माजी खेळाडू आणि झारखंडचे कोषाध्यक्ष शाहबाज नदीम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे, की हे यश धोनीच्या सल्ल्यामुळे मिळाले आहे.
एमएस धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असून त्याने २७८ सामने आणि २४२ डावांमध्ये ३८.८० च्या सरासरीने ५,४३९ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने १३७.४५ चा स्ट्राईक रेट आणि २४ अर्धशतके ठोकली आहेत, ज्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद ८४ धावा राहिला आहे.
अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रामकृष्ण घोष, संजू सॅमसन, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, सय्यद खलील अहमद, आयुष म्हात्रे, देवाल्ड ब्रेविस, उर्फ शर्मा, प्रशांत वीर (रु. 14.20 कोटी), मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, जॅक फॉक्स, अकेल होसेन, राहुल चहर, मॅट हेन्री