Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरिस ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ॲथलीट्सचा पुणेकरांच्या वतीने गौरव; खेळाडूंसाठी भरघोस आर्थिक साहाय्य

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 31, 2024 | 08:34 PM
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा पुणेकरांच्या वतीने गौरव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा पुणेकरांच्या वतीने गौरव

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पॅरिस ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ॲथलीट्सचा पुणेकरांच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी सनी निम्हण यांनी हा कार्यक्रम  स्व. विनायक निम्हण यांनी सुरु ठेवलेला आदर्श व सामाजिक कार्याचा वसा कायम सुरु ठेवू,असे आश्वासित करीत खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी केले.

या खेळाडूंचा जाहीर सत्कार

सत्कारमूर्ति खेळाडूंमध्ये पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे, ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेले सातारा जिल्ह्याच्या फलटण सारख्या ग्रामीन भागातील तिरंदाज प्रविण जाधव आणि ॲथलेट नाशिक जिल्हामधील देवगावचा सर्वेश कुशारे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदकाला गवसनी घालणारी भारताची पहिली महिला तिरंदाज तसेच अर्जुन पुरस्कार सन्मानीत सातारची आदिती स्वामी आणि सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार सन्मानीत आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत एक सुवर्ण आणि ३ रौप्यपदके पटकावणारा पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचा खेळाडू शुभंकर खवले यांचा समावेश होता. नेमबाजीच्या प्रशिक्षिका व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती दिपाली देशपांडे, तिरंदाजी प्रशिक्षक सातारचे प्रविण सावंत, मल्लखांब प्रशिक्षक अभिजीत भोसले यांचा याप्रसंगी गौरवचिन्ह व रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

पुनीत बालन ग्रुपतर्फे खेळाडूंना लाखो रुपयांचे आर्थिक पाठबळ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलतान प्रसिद्ध उद्योगपती पुनित बालन म्हणाले की आपल्याला मिळालेल्या एक रुपयातील ३० पैसे समाजाचे ऋण फेडण्यासाठी खर्च करावेत ही शिकवन मला माझ्या आईने दिली होती. हे तत्व डोळ्यासमोर ठेवीतच मी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आणि संस्थांना मदत करीत असतो. खेळाडूंच्या विकासासाठी खेळाडू, पालक प्रशिक्षक संघटक व प्रायोजक यांनी एकत्रितपणे काम केले तर निश्चितच आपले खेळाडू ऑलिंपिक मध्ये नेत्रदीपक कामगिरी असा विश्वास बालन यांनी व्यक्त केला. या वेळी पुनित बालन यांनी स्वप्निल कुसळे यास ११ लाख रुपयांचे सहाय्य तर आदिती स्वामी, सर्वेश कुशारे, ओजस देवतळे, प्रवीण जाधव व शुभंकर खवले यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ देत अशल्याचे जाहीर केले.

मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये ४० दशाकहुन जास्त कार्यरत असलेले विनायक दळवी, सुहास जोशी, शरद कद्रेकर यांच्याबरोबर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, मिलिंद ढमढेरे, शिवाजी गोरे, कीर्ती पाटील, संजय दुधाने यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. देशाने गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. त्यामुळेच आपले खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा यामध्ये चांगले यश मिळवित असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की स्वप्निल कुसाळे या नेमबाजाने ऐतिहासिक ऑलिंपिक पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.

नागरी सत्कार करण्याची कल्पना सनी निम्हण यांची
या पदक विजेत्यांचा सत्कार एकाद्या संस्थेकडून न करता पुणेकारांच्यावतीने नागरी सत्कार करण्याची कल्पना सनी निम्हण यांची असल्याचे क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले. खेळाडूंना योग्य वेळी आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज विशद करुन त्यासाठी सोमेश्वर फऊंडेशनच्यावतीने टोकन स्वरुपात रोख रक्कम देण्यात आल्याचे जाधव म्हणाले.

अभ्यासाबरोबर खेळाकडेही एकाग्रतेने लक्ष द्यावे- स्वप्निल

लहानपणापासूनच मला माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी अभ्यासाबरोबरच खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच कोणतेही यश मिळवण्यासाठी संघर्षाबरोबरच काही कालावधी जावा लागतो. मी देखील बारा वर्षे अतिशय चिकाटीने सराव केला.त्यामुळेच मी ऑलिंपिक पदकापर्यंत पोहोचू शकलो असे स्वप्निल कुसाळे याने याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण पदक जिंकल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी पहिला फोन सनी निम्हणसरांचा एबीपी माझाचे वार्तांकन करणारे संदीप चव्हाण यांच्याकडे आल्याची आठवण स्वप्निल याने याप्रसंगी आवर्जुन सांगितली. या समारंभात स्वप्निलच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे, तसेच प्रताप जाधव, सनी निम्हण, संदीप चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या समारंभास विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची उपस्थिती

या समारंभास विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, ज्येष्ठ ऑलिंपिकपटू बाळकृष्ण अकोटकर, ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत स्मिता यादव – शिरोळे, अर्जुन पुरस्कार सन्मानीत शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, श्रीरंग इनामदार, ऑलिंम्पियन मनोज पिंगळे, प्रशिक्षक विजय जाधव, व्हॉलीबॉलचेआंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देविदास जाधव, सातारचे जेष्ठ कबड्डीपड्डू विजय जाधव, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रंजीत चामले, खोखोपटू बिपिन पाटील, अभिजीत मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे शहरप्रमुख ॲड. अरविंद तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित गौरव समारंभात या सोहळ्याच्या अधक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती व खेळाडूंचे पाठीराखे पुनित बालन होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोमेश्वर फाऊंडेशनचे सनी निम्हण, क्रीडा जागृतीचे प्रताप जाधव यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. केंद्र शासनाने सन २०१४ पासून क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक धोरण स्वीकारले असून त्याद्वारे अनेक चांगले बदल झाले आहेत त्यास अनुसरून राज्य शासनही प्रयत्न करीत असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Public felicitation on behalf of people of pune to athletes who raised honor of maharashtra in paris olympic 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 08:34 PM

Topics:  

  • indian athletes
  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.