PV Sindhu Marriage: लवकरच बोहोल्यावर चढणार पी.व्ही. सिंधू! होणारा नवरा आहे तरी कोण?
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीव्ही सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 22 डिसेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. सिंधूचे भावी पती व्यंकट दत्ता साई हे वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. पीव्ही सिंधूच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लग्नाचे कार्यक्रम 20 डिसेंबरपासून सुरू होतील आणि 24 डिसेंबरला दोन्ही कुटुंबे हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजनही करणार आहेत.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
पीव्ही सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होते. पण एक महिन्यापूर्वीच लग्नाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की, सिंधूचे जानेवारीपासून बॅडमिंटनचे खूप व्यस्त वेळापत्रक असेल, त्यामुळे डिसेंबर हा लग्नाचा सर्वोत्तम काळ आहे. 22 डिसेंबरला उदयपूरमध्ये लग्न होणार असून 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. यानंतर सिंधू तिच्या प्रशिक्षणात व्यस्त होईल. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
व्यंकट दत्ता साई हे पोसाइडेक्स टेक्नोलॉजीजचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहेत. त्यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि ते इंडियन रेवेन्यू सर्विसमध्ये (IRS) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पीव्ही सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लाँच केला होता. आता लवकरच पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई लग्नबंधनात अडकणार आहेत.
व्यंकट दत्ता साई यांनी जेएसडब्ल्यू आणि सौर एप्पल एसेट मॅनेजमेंट मध्ये काम केले आहे. डिसेंबर 2019 पासून, त्यांनी पोसाइडेक्स टेक्नोलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक पदाची धुरा हाती घेतली. ही कंपनी भारतात डेटा व्यवस्थापनाचे काम करते. व्यंकट दत्ता साई यांनी फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
त्यांनी 2018 मध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून बीबीए अकाउंटिंग आणि फायनान्सचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगलोर येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. व्यंकट दत्ता साई यांनी जेएसडब्ल्यूसोबत समर इंटर्न तसेच इन-हाउस कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. 2019 पासून, त्यांनी सौर एप्पल एसेट मॅनेजमेंटसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे.