सौजन्य - indiancricketteam IND vs JPN U19 : भारतीय कर्णधार मोहम्मद अमानचे वादळी शतक, जपानी गोलंदाजांची केली धुलाई
शारजा : आशिया चषक अंडर-19 मध्ये भारत विरुद्ध जपान सामन्यात भारतीय कर्णधार मोहम्मद अमानने ACC अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत जपानविरुद्ध 122 धावांची शानदार खेळी केली, मोहम्मदच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. मोहम्मद अमानने जपानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेत मैदानाच्या चौफेर टोलेबाजी केली. आयुष म्हात्रे आणि केपी कार्तिकी यांनीही महत्त्वाचे योगदान देत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
एसीसीमध्ये अंडर-19 मध्ये भारतीय कर्णधाराचे शानदार शतक
मोहम्मद अमानने जपानविरुद्ध ठोकले शतक
भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने जपानविरुद्ध चमत्कार केला. ACC अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत त्याने अप्रतिम शतक झळकावले. अमानने 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 81 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर अमन फलंदाजीला आला. त्याने मोठ्या हुशारीने फलंदाजी करीत संघाचा धावफलक हलता ठेवला. अमनने योग्य क्रिकेटचे शॉट्स खेळले आणि त्याला धावा काढण्याची घाई नव्हती. ते सेट झाल्यावर. त्यानंतर त्याने आपले खरे रंग दाखवले.
मोहम्मद अमान १२२ धावा करून नाबाद
18 वर्षीय मोहम्मद अमान शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 103 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करीत 118 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. अमनने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. जपानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 50 षटके खेळून 6 गड्यांच्या मोबदल्यात 339 धावा केल्या. अंडर-19 आशिया चषक स्पर्धेतील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयुष म्हात्रेचे झंझावाती अर्धशतक
भारताचा सलामीवीर आयुष म्हात्रेने या सामन्यात आपले अर्धशतक (54 धावा) 27 चेंडूत पूर्ण केले. आयुषनेही आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. केपी कार्तिकेयनेही मधल्या फळीत येऊन चांगली फलंदाजी केली. त्याने 49 चेंडूत 57 धावा केल्या. आशिया चषकातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. मात्र, मोठी खेळी खेळताना वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्याला चांगली सुरुवात झाली. पण, त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही आणि अवघ्या 23 धावांवर तो बाद झाला. भारताने जपानला 340 धावांचे मोठे लक्ष्य दिले.
हेही वाचा : IND vs AUS : टीम इंडियासाठी दुसऱ्या कसोटीत सलामीला कोण येणार? सामन्यापूर्वी दिले संकेत