Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Top 10 Test Ranking : अफगाणिस्तानचा इतिहास घडला! रहमत शाह यांची आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप-10 मध्ये एंट्री

ICC Top 10 Test Ranking : अफगाणिस्तानचा कर्णधार रहमत शाह यांची ऐतिहासिक कामगिरी. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारे पहिले अफगाण क्रिकेटपटू ठरले. सातव्या क्रमांकावर झेप.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 04:23 PM
ICC Top 10 Test Ranking : अफगाणिस्तानचा इतिहास घडला! रहमत शाह यांची आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप-10 मध्ये एंट्री

ICC Top 10 Test Ranking : अफगाणिस्तानचा इतिहास घडला! रहमत शाह यांची आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप-10 मध्ये एंट्री

Follow Us
Follow Us:
  • 173 धावांच्या खेळीचा मोठा फायदा
  • सातव्या स्थानी पोहचणारा पहिला अफगाण क्रिकेटपटू
  • झिम्बॉब्वेच्या क्रेग एर्विनलाही फायदा
 

अफगाणिस्तानचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रहमत शाह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयसीसीच्या पुरुष कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत टॉप-10 (ICC Top 10 Test Ranking) मध्ये स्थान मिळवणारे तो अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध शारजाह येथे झालेल्या कसोटी सामन्यातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांने सहा स्थानांची झेप घेत सातवे स्थान पटकावले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासात त्याच्या नावावर आणखी एक महत्त्वपूर्ण विक्रमाची नोंद झाली आहे.

झिम्बॉब्वेविरुद्ध रहमतची 173 धावांची खेळी

झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रहमत शाहने 173 धावांची शानदार खेळी केली. त्यांच्या या खेळीचा फायदा त्याला आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत झाला. सहा स्थानांची प्रगती करत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले. या कामगिरीमुळे त्याने भारताचा कर्णधार शुभमन गिल, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम आणि श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस यांसारख्या आघाडीच्या फलंदाजांना मागे टाकले.

33 वर्षीय रहमत शाहचे  कसोटी क्रिकेटमधील हे पाचवे शतक ठरले. विशेष म्हणजे, चालू वर्षातील त्याचे हे दुसरे शतक आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेटला नवी ओळख मिळत आहे. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानने आयसीसी पुरुष वनडे संघांच्या क्रमवारीतही ऐतिहासिक प्रगती केली होती. संघाने सहावे स्थान मिळवत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक

झिम्बॉब्वेच्या क्रेग एर्विनलाही फायदा

दरम्यान, झिम्बाब्वेचा फलंदाज क्रेग एर्विन यालाही कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या शारजाह कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतकी खेळी केल्यामुळे त्याने नऊ स्थानांची प्रगती केली. तो आता 48 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मालिकेनंतरही फलंदाजांच्या क्रमवारीत बदल झाले आहेत. वेस्ट इंडिजचा कावेम हॉज याने 12 स्थानांची झेप घेत 52 वे स्थान मिळवले. बांगलादेशचा तौहिद हृदॉय 60 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर वेस्ट इंडिजचा आमिर जंगू याने तब्बल 28 स्थानांची प्रगती करत 62 वे स्थान पटकावले.

Dilip Vengsarkar : क्रिकेटमध्ये कौशल्यासोबत मेहनत, शिस्तही महत्त्वाची; दिलीप वेंगसरकर यांचा युवा खेळाडूंना कानमंत्र

जोमेल वॉरिकनचीही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

गोलंदाजांच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा फिरकीपटू जोमेल वॉरिकन यानेही लक्षवेधी कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरल्यानंतर त्याला कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला. त्याने 11 स्थानांची झेप घेत गोलंदाजांच्या यादीत 19 वे स्थान मिळवले. त्याचबरोबर कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही चार स्थानांची प्रगती करत 31 वे स्थान पटकावले.

वेस्ट इंडिजच्याच जस्टिन ग्रीव्ह्ज यालाही अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याने एका स्थानाची प्रगती करत आठवे स्थान मिळवले आहे.

वनडे क्रमवारीत भारतीय गोलंदाजांची प्रगती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांनंतर ताज्या क्रमवारीत भारतीय गोलंदाजांनीही प्रगती केली आहे. भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल याने वेलिंग्टन येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 28 धावांत दोन बळी मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याने वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत 23 स्थानांची झेप घेत 21 वे स्थान मिळवले.

न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात चार बळी घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यानेही 11 स्थानांची प्रगती केली. तो आता 31 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

युवा भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर बरार यानेही आपल्या कामगिरीने लक्ष वेधले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो टॉप-100 च्या बाहेर होता. मात्र, दोन सामन्यांत सात बळी मिळवत त्याने थेट 48 व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय गोलंदाजांच्या प्रगतीचीही चर्चा होत आहे.

 

Web Title: Rahmat shah first afghanistan player icc top 10 test ranking rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Zimbabwe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.