सौजन्य - नवराष्ट्र टीम
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश संपादन केले. तर समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.
खेळाडूंनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. राष्ट्रीय स्तरावर बारामतीच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर बारामतीचे नाव उज्ज्वल केले. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन सातव, संभाजी नाना होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती तालुका दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, मलारी बंडलकर आणि सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे तसेच पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Ans: श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात सुवर्णपदक, तर समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले.
Ans: अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवून बारामतीचा नावलौकिक वाढविला.
Ans: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या बारामतीच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.






