Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton: पुण्यनगरीत रायगडच्या संघाचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले ‘हे’ दुहेरी विजेतेपद

Badminton: निर्णायक एकेरीच्या सामन्यात प्रांजल शिंदेने समन्वया धनंजयचा १५-११, १५-१३ असा पराभव करत रायगडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.उपांत्य फेरीत रायगडने मुंबई उपनगरचा २-० असा पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 04:57 PM
बॅडमिंटनमध्ये रायगड संघाला दुहेरी विजेतेपद

बॅडमिंटनमध्ये रायगड संघाला दुहेरी विजेतेपद

Follow Us
Follow Us:
  • बॅडमिंटनमध्ये रायगड संघाला दुहेरी विजेतेपद
  • सब-ज्युनियर सांघिक बॅडमिंटनमध्ये मुला-मुलींच्या दोन्ही गटांत बाजी
  •  बुलढाणा आणि पुणे संघांचा पराभव
Pune: सुधांशु बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि समर्थ ग्रुपच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय सब-ज्युनियर आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगड संघाने मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावून दुहेरी कामगिरी नोंदवली.

शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रायगडने बुलढाणा संघाचा २-१ असा पराभव केला. रायगडच्या कृत्य पटेलने एकेरीच्या सामन्यात बुलढाण्याच्या देवव्रत खांडेकरचा १५-५, १५-६ असा सहज पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली.त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात बुलढाण्याच्या देवव्रत खांडेकर आणि करण सावळे यांनी रायगडच्या कृत्य पटेल व मयुरेश भुटकी यांचा ११-१५, १७-१५, १५-११ असा पराभव करत सामना बरोबरीत आणला.

कृत्य पटेल-मयुरेश भुटकी जोडीचा धडाका

निर्णायक एकेरीच्या सामन्यात रायगडच्या प्रगणय शिंदेने करण सावळेचा १५-९, १५-६ असा पराभव करत रायगडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.रायगडने उपांत्य फेरीत नागपूरचा २-० असा पराभव केला होता. या सामन्यात कृत्य पटेलने आदित्य यौलचा १७-१५, १०-१५, १५-१० असा पराभव केला, तर दुहेरीत कृत्य पटेल-मयुरेश भुटकी या जोडीने आदित्य यौल-साईराज नायसे जोडीवर १५-९, १५-८ अशी मात केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बुलढाण्याने ठाण्याचा २-० असा पराभव केला. देवव्रत खांडेकरने विश्वजीत थविलचा १५-१२, १६-१८, १५-१२ असा पराभव केला, तर देवव्रत खांडेकर-करण सावळे जोडीने मयंक राजपूत-विश्वजीत थविल जोडीवर १५-८, १५-९ अशी मात केली.

मुलींच्या गटातही रायगडची सरशी

१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत रायगडने पुणे संघाचा २-१ असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. रायगडच्या अनुष्का इप्टे आणि प्रांजल शिंदे यांनी निर्णायक कामगिरी बजावत संघाला जेतेपद मिळवून दिले.पहिल्या एकेरीच्या सामन्यात अनुष्का इप्टेने पुण्याच्या कायरा रैनाचा ८-१५, १७-१५, १५-१० असा पराभव करत रायगडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीत पुण्याच्या शरयू रांजणे आणि सोयरा शेलार यांनी अनुष्का इप्टे-प्रांजल शिंदे जोडीचा १५-१३, १५-७ असा पराभव करत सामना बरोबरीत आणला.

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

निर्णायक एकेरीच्या सामन्यात प्रांजल शिंदेने समन्वया धनंजयचा १५-११, १५-१३ असा पराभव करत रायगडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.उपांत्य फेरीत रायगडने मुंबई उपनगरचा २-० असा पराभव केला. अनुष्का इप्टेने स्पृहा जोशीचा १५-१२, १५-१० असा पराभव केला. त्यानंतर अनुष्का इप्टे-प्रांजल शिंदे जोडीने अनिका तनेजा-गार्गी दाभोलकर जोडीवर १५-५, १५-७ अशी मात केली.

विजेत्यांना रोख पारितोषिक

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व २५ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व १५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण समर्थ ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र भगत, एमबीएच्या कार्यकारी समितीचे सदस्य विश्वास देशवंडीकर, पीडीएमबीएचे स्पर्धा सचिव राजीव बाग आणि स्पर्धा सचिव सुधांशु मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!

💡

Frequently Asked Questions

  • Que: योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय स्पर्धेत कोणता संघ जिंकला?

    Ans: योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय सब-ज्युनियर आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगड संघाचा विजय झाला.

  • Que: या स्पर्धेत कोणत्या संघाचा पराभव झाला?

    Ans: योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा आणि पुणे संघांचा पराभव झाला.

Web Title: Raigad girla dn boys team win trophy yonext state level badminton pune sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Badminton

संबंधित बातम्या

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
1

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.