
Pune Sports News
Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!
नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. नागपूर संघाने २-१ असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. नागपूरकडून वैष्णवी मांगलेकर आणि सान्वी घाटे यांनी एकेरीच्या लढतीत प्रभावी खेळ केला. अन्य सामन्यांत रायगडने मुंबई शहर संघाचा २-० असा, तर मुंबई उपनगरने सोलापूर संघाचा २-० असा पराभव केला.
मुलांच्या गटात ठाणे संघाने अमरावतीवर २-० अशी मात केली. विश्वजीत थविल आणि मयंक राजपूत यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. बुलढाणा संघानेही सांगलीचा २-० असा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली. बुलढाण्याकडून देवव्रत खांडेकर आणि करण सावळे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. रायगडने सातारा संघाचा २-० असा, तर नागपूरने मुंबई शहर संघाचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी
आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची कमाई सुरूच आहे. भारताच्या नितेश कुमार आणि थुलसिमथी मुरुगेसन या जोडीने बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी एसएल-3, एसयू-5 गटात रौप्यपदक पटकावले.
Ans: योनेक्स सनराईज एसबीए कप स्पर्धेच्या मुलांच्या गटात ठाणे संघाने सेमीफायनलमध्ये पोचला आहे.
Ans: मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे.