फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आज चॅम्पियन ट्रॉफीचा सातवा सामना सुरु व्हायला उशीर झाला आहे, त्याचे कारण म्हणजेच पाऊस. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याचे आयोजन रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार सामना २.३० वाजता सुरु होणार होता. पण मागील काही वेळेपासून रावळपिंडी येथे पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नाणेफेकसाठी देखील उशीर झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा नाणेफेक दुपारी २ वाजता होणार होता पण पावसामुळे तो उशिरा झाला आहे. चाहत्यांना लाईव्ह सामना पाहण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागू शकते.
सामन्यात षटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. दुपारीच रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये फ्लडलाइट्स चालू करावे लागले. संध्याकाळीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain has delayed the toss in the upcoming #AUSvSA clash in Rawalpindi 🌧#ChampionsTrophy
Live updates ➡ https://t.co/yT4F7I2FDh pic.twitter.com/QOpDWQ3W12
— ICC (@ICC) February 25, 2025
हवामान वेबसाइटनुसार, आज आणि पुढील काही दिवस रावळपिंडीमध्ये सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उशिरा सुरू झाला तरी, पावसामुळे तो मधल्या काळात व्यत्यय येऊ शकतो. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये आर्द्रता ५९ टक्क्यांपर्यंत राहील. ताशी ५ ते १० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मधील एक महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघ त्यांचे मागील सामने जिंकल्यानंतर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवले आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवले. दक्षिण आफ्रिकेला जिंकून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहायचे आहे. जर ऑस्ट्रेलियाला वर यायचे असेल तर त्यांना आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. आज जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी आपला दावा मजबूत करेल.
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला हरवले. या सामन्यात जोस इंग्लिसची बॅट पूर्ण जोमात होती. या फलंदाजाने ८६ चेंडूत १२० धावांची खेळी केली. कमिन्सने या फलंदाजाचे खूप कौतुक केले आहे. तो म्हणाला, “असे वाटत होते की त्याच्या कारकिर्दीतील हा अचानक आलेला विजय आहे. तो मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध उत्तम खेळतो. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. आता त्याच्याकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके आहेत. तो चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकला आहे. त्याला वाट पाहावी लागली, पण तो तयार होता.”