Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांची मजुरी, भावाचा त्याग अन् Raja Muthupandi ची मेहनत; CWG 2026 मध्ये भारतासाठी मिळवले रौप्यपदक

raja muthupandi won silver in cwc 2026: भारताच्या राजा मुथुपांडीने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६५ किलो गट रौप्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवूमन दिला. या प्रकारातील भारताचे हे चौथे पदक आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 04:28 PM
वडिलांची मजुरी, भावाचा त्याग अन् Raja Muthupandi ची मेहनत; CWG 2026 मध्ये भारतासाठी मिळवले रौप्यपदक
Follow Us
Follow Us:
  • राजा मुथुपांडीने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले रौप्य;
  • भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर
  • मुथुपांडीने स्नॅच राऊंडमध्ये उचलले १२६ किलो वजन
भारताच्या राजा मुथुपांडीने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth games 2026) वेटलिफ्टिंगमध्ये ६५ किलो गटात रौप्य पदक जिंकले.२६ वर्षीय राजा मुथुपांडीने एकूण २८६ किलो (स्नॅचमध्ये १२६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो) वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे चौथे पदक असून, भारतीय वेटलिफ्टिंग संघाची प्रभावी कामगिरी कायम राहिली आहे. दरम्यान, मलेशियाच्या अझनील बिन बिदिन मोहम्मदने २९९ किलोचा विक्रमी वजन उचलून सुवर्ण पदक जिंकले, जे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील त्याचे सलग तिसरे सुवर्ण पदक आहे. तर पापुआ न्यू गिनीच्या मोरिया बारूने २८२ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.

Commonwealth Games 2026: सुवर्ण हुकले, पण ऋषिकांता सिंहची ऐतिहासिक कामगिरी; भारताला मिळवून दिले पहिले रौप्यपदक

मुथुपांडीने स्नॅच राऊंडमध्ये उचलले १२६ किलो वजन

राजा मुथुपांडीने आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. त्याने स्नॅच फेरीत दुसऱ्या प्रयत्नात १२६ किलो वजन उचलून आघाडी घेतली. त्यानंतर त्याने क्लीन अँड जर्क फेरीत दुसऱ्या प्रयत्नात १६० किलो वजन यशस्वीरित्या उचलले. एकूण २८६ किलो वजन उचलून त्याने ग्लासगोमध्ये भारतासाठी रोप्य पदकाची कमाई केली.

कोण आहे राजा मुथुपांडी?

राजा मुथुपांडीचा जन्म १२ जानेवारी २००० रोजी तामिळनाडूतील कोविलपट्टी येथे झाला. राजाचे बालपण गरिबीत गेले. राजाचे वडील आगपेटीच्या कारखान्यात रोजंदारीवर काम करतात, तर त्याची आई मिठाईच्या दुकानात साफसफाईचे काम करते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती की, कधीकधी दिवसातून दोन वेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण व्हायचे.

राजाच्या मोठ्या भावाने सर्वात आधी वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात केली. राजाने सुद्धा त्याच्यासोबत जिमला जाण्यास सुरुवात केली. पण घरातील जबाबदाऱ्यांमुळे मोठ्या भावाला तो खेळ सोडावा लागला. कुटुंबासाठी भावाने आपल्या स्वप्नांचा त्याग केला, तर राजाने तेच स्वप्न पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि देशासाठी रोप्यपदक जिंकून ते स्वप्न पूर्ण केले.

राजाचा संघर्षमय प्रवास

राजाने २०१७ मध्ये, राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकून ओळख मिळवली. त्यानंतर वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सहावे स्थान पटकावले. यानंतर, २०१९ मध्ये झालेल्या कोपराच्या गंभीर दुखापतीमुळे त्याची कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली होती, ज्यामुळे तो २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी होऊ शकला नाही. २०१९ ते २०२५ या काळात त्याच्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. सर्वात आधी, त्याच्या डाव्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, त्याच्यावर अपेंडिसाइटिसचा उपचार झाला. जेव्हा त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राष्ट्रीय चॅम्पियनशिप दरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

२०२५ च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने २९९ किलो वजन उचलून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि नववे स्थान पटकावले. २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील त्याच्या रौप्य पदकामुळे वेटलिफ्टिंगमधील भारताच्या पदकांची एकूण संख्या चार झाली आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.

भारताने चौथ्या दिवशी ३ पदके जिंकली

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुथुपांडीच्या आधी, ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले , तर चनंबम ऋषिकांता सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. त्यांच्या आधी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झंडू कुमारने पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण

Web Title: Raja muthupandi wins silver commonwealth games 2026 weightlifting india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Tamilnadu
  • weightlifting

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.