वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी हे दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यासाठी निवडीकरिता उपलब्ध नाहीत. या दोन्ही युवा खेळाडूंची अनुपस्थिती संघासाठी एक मोठा धक्का मानली जात आहे. हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे कर्णधार शुभमन गिलसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
बुमराहला मैदानात पाहण्यासाठी आतुर आहेत .परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सहभागही अनिश्चित मानला जात आहे. बुमराहला ३० जुलैपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यानंतर तो बंगळूरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपला फिटनेस रिपोर्ट सादर करेल. जर त्याचा फिटनेस रिपोर्ट चांगला असेल, तर तो संघात सामील होऊ शकेल. मात्र, जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर त्यालाही मालिकेतून बाहेर पडावे लागू शकते. जर बुमराह संघाबाहेर गेला तर हा संघासाठी मोटा धक्का असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बुमराहप्रमाणेच सुदर्शनदेखील दुखापतीतून सावरत आहे. या मालिकेत साई सुदर्शनचा सहभाग अद्याप निश्चित मानला जात नाही. परंतु, निवड समिती या दोन्ही अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश करू शकते.
वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीला मुकणार असल्याची माहिती आहे.अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. परंतु, २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील एसएससीमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये कमबॅक करण्याची होण्याची दाट शक्यता आहे, पण हे पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
दुखापतींमुळे तणाव वाढला असला तरी, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन जवळपास निश्चित आहे. फिरकी गोलंदाजी विभागात, मानव सुथारने पदार्पणातच सात विकेट घेतल्यानंतर, हर्ष दुबे आपले स्थान टिकवून ठेवू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह






