Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR New Owner: एकेकाळी घरी TV सुद्धा नाही अन् आज १५,००० कोटी रुपयांचा संघ घेतला विकत; कोण आहे Rajasthan Royalsचे नवे मालक?

Rajasthan Royals new Owner : महाराष्ट्राच्या विदर्भातील असणारे कैलाश सोमानी हे राजस्थान रॉयल्स या संघाचे नवे मालक बनले आहे. सामान्य कुटुंबातून असाणाऱ्या कैलाश यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 01:27 PM
Rajasthan Royals new Owner 2026 Kailash Somani marathi information IPL Live

Rajasthan Royals new Owner 2026 Kailash Somani marathi information IPL Live

Follow Us
Follow Us:

Rajasthan Royals Owner Kailash Somani IPL : मुंबई : सध्या भारतामध्ये आयपीएल 2026 चा थरार सुरु असून मॅच रंगामध्ये आल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त खेळ किंवा खेळाडू नाही तर संघाचे मालक देखील चर्चेत आले आहेत. Rajasthan Royalsचे नवे मालक कैलाश सोमानी यांच्या चर्चा वाढल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या कैलाश सोमानी यांनी तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा आयपीएल संघ विकत घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

१५ ऑगस्ट १९७४ रोजी वाशिम येथे जन्मलेले कैलाश सोमानी हे एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांनी पूर्ण प्रयत्नांने व्यवसाय करुन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आज त्यांच्या मेहनतीची चर्चा फक्त देशात नाही तर जागतिक पातळीवर होत आहे. जागतिक व्यावसायिक विश्वात कैलाश सोमानी यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. एडटेक, डेटा प्रायव्हसी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये उभारलेला त्यांचा व्यवसाय आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे राजस्थान रॉयल्ससारखा एक प्रतिष्ठित संघ विकत घेऊन त्यांनी हे दाखवून दिले आहे की योग्य दिशेने उचललेले प्रत्येक पाऊल अखेरीस विलक्षण यश मिळवून देते.

हे देखील वाचा : बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये फ्रँचायझी मिळवण्याचा त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर परिवर्तन घडवणारा ठरला आहे. त्यांनी १.६३ अब्ज डॉलर्स (अंदाजे १५,२८६ कोटी रुपये) मध्ये राजस्थान रॉयल्सची मिळवलेली मालकी याने त्यांना जागतिक क्रीडा गुंतवणूकदारांच्या उच्चभ्रू गटात स्थान मिळवून दिले आहे .सोमानी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. त्यांना सुरुवातीच्या काळात अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला.वयाच्या १६ व्या वर्षी वडील नंदकिशोर सोमानी यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. या कठीण परिस्थितीतही, त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही.

वाशिम येथील मुळीबाई चरखा विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवली. क्रिकेटची प्रचंड आवड असूनही, त्यांच्या घरी टीव्हीसुद्धा नव्हता, पण त्यांनी आपली स्वप्ने शिक्षण आणि कौशल्य विकासाकडे वळवली. हाच निर्णय पुढे त्यांची सर्वात मोठी ताकद बनला.

आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा

  • २००० च्या दशकात अमेरिकेत स्थलांतर
  • आयवामधील सिडर रॅपिड्स येथे कारकिर्दीची सुरुवात
  • नोकरी सोडून उद्योजकतेकडे वाटचाल
    ॲरिझोनामध्ये यशस्वी व्यवसाय स्थापन करणे
    त्यांचे व्यावसायिक उपक्रम एडटेक, डेटा प्रायव्हसी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स गव्हर्नन्स आणि स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत, ज्यामुळे ते नवोन्मेषाच्या जगात एक अग्रणी बनले आहेत.
आज, त्यांच्या उपक्रमात अमेरिकेत १,००० हून अधिक आणि पुण्यात ४०० लोक काम करतात.

हैदराबादमधील विस्ताराची योजनाही सुरू आहे, जी त्यांचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील दिशा दर्शवते.

हे देखील वाचा :  नादच खुळा! RR च्या रवी बिश्नोईने Gujrat Titans ची ‘टायटॅनि’क बुडवली; गिलच्या टीमचा 6 रन्सने पराभव

आपल्या मुळांशी जोडलेले

जागतिक यश मिळवूनही, कल सोमानी आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांनी अकोला-नागपूर महामार्गावरील तळेगाव शामजीपंत येथे क्रिकेट अकादमी स्थापन करून तळागाळातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी रुपयांचे योगदानही दिले आहे.

हा करार विशेष का आहे?

  • राजस्थान रॉयल्स, आयपीएलच्या सुरुवातीच्या संघांपैकी एक
  • पहिल्या हंगामाचा विजेता संघ
  • ऐतिहासिक वारसा आणि मजबूत ब्रँड मूल्य
  • तंत्रज्ञान आणि क्रीडा यांच्या संगमाचे एक नवीन मॉडेल

Web Title: Rajasthan royals new owner 2026 kailash somani marathi information ipl live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • cricket sports
  • IPL 2026
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र
1

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.