Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranji Trophy 2025 : भारतीय संघाने वेळोवेळी नाकार! आता कर्णधार होताच रजत पाटीदारने द्विशतक झळकवून दिला इशारा 

इंदूरमधील एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल ग्राउंडवर पंजाबविरुद्ध मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने द्विशतक झळकवले आहे. कर्णधारधार पदाच्या पदर्पणाच्या सामन्यात रजतने ही कामगिरी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 17, 2025 | 07:33 PM
Ranji Trophy 2025: Indian team rejected time and again! Now as captain, Rajat Patidar hits double century, gives warning

Ranji Trophy 2025: Indian team rejected time and again! Now as captain, Rajat Patidar hits double century, gives warning

Follow Us
Close
Follow Us:

Madhya Pradesh vs Punjab Ranji Trophy 2025 Match : रणजी ट्रॉफी २०२५ चा हंगामाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशचा कर्णधार असलेल्या रजत पाटीदारने या हंगामाची सुरवात दिमाखात केली आहे. त्याने  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. रजत पाटीदारने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावून  मोठी डरकाळी फोडली आहे.  उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रजत पाटीदारने त्याच्या डावात एक देखील षटकार ठोकला नाही. त्याने त्याच्या खेळीमध्ये काही आश्चर्यकारक शॉट्स मारले आहेत आणि  26 चौकारांच्या मदतीने त्याने द्विशतकाला गवसणी घातली आहे.

हेही वाचा : IND VS AUS : “जर फिट असता, तर संघात…”, मोहम्मद शमीच्या आरोपांवर अजित आगरकर बरसले..

रजत पाटीदारने ठोकले द्विशतक

इंदूरमधील एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल ग्राउंडवर पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या  दुसऱ्या दिवशी रजत पाटीदारने शतक झळकावले, पण तो यावरच थांबला नाही. तर त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले द्विशतक देखील झळकावले. पाटीदारची खेळी देखील खास राहिली आहे कारण त्याने त्याच्या बहुतेक धावा टेलएंडर्ससोबत भागीदारीत रचत केल्या आहेत.

मागील हंगामात इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक सुरुवातीनंतर रजत पाटीदारला भारतीय कसोटी संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर, गेल्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या सुरुवातीपासूनच पाटीदारने चमकदार कामगिरी केली आहे. पाटीदार मध्य प्रदेशचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता, त्याने ४८.०९ च्या सरासरीने ५२९ धावा फटकावल्या होत्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकं लगावली होती. तसेच त्याने मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत देखील पोहचवले.

रजत पाटीदारची कामगिरी

आरसाबीने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल जेतेपद देखील आपल्या नावावर केले. तसेच त्याने  सप्टेंबरमध्ये बेंगळुरू येथे झालेल्या दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेत सेंट्रल झोनचे नेतृत्व करताना, पाटीदारने सलग चार अर्धशतके झळकावली होती, ज्यामध्ये क्वार्टर फायनल आणि फायनलमध्ये दोन शतकांचा समावेश होता. दक्षिण झोनविरुद्धच्या अंतिम सामन्यात, रजत पाटीदारने पहिल्या डावात शतक झळकावले आणि सेंट्रल झोनला १० वर्षांनी दुलीप ट्रॉफी जिंकण्यात मोठी भूमिका बाजवली.

हेही वाचा :Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर

रजत पाटीदार टीम इंडियामध्ये परतणार?

रजत पाटीदारच्या फॉर्ममध्ये चांगले सातत्य आहे, तो शानदार कामगिरी देखील करत आहे, परंतु त्याला अद्याप भारत अ संघात स्थान मिळालेले नाही. आता रणजी ट्रॉफीमधील  द्विशतकानंतर, बीसीसीआय निवडकर्ते त्याचा विचार करून दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्याची शक्यता आहे.

Web Title: Rajat patidars double century as captain in punjab vs madhya pradesh ranji trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • Ranji Trophy 2025

संबंधित बातम्या

Ranji Trophy Round-1 : दुसऱ्या दिनी 5 द्विशतके आणि 6 शतके, पुदुच्चेरी आणि छत्तीसगडच्या गोलंदाजांनी घातला धुमाकूळ
1

Ranji Trophy Round-1 : दुसऱ्या दिनी 5 द्विशतके आणि 6 शतके, पुदुच्चेरी आणि छत्तीसगडच्या गोलंदाजांनी घातला धुमाकूळ

Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर
2

Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर

Ranji Trophy 2025 :मुंबई संघाची घोषणा! शार्दुल ठाकूरकडे सोपवली धुरा; ‘या’ दिग्गज खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता 
3

Ranji Trophy 2025 :मुंबई संघाची घोषणा! शार्दुल ठाकूरकडे सोपवली धुरा; ‘या’ दिग्गज खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.