मोहम्मद शमी आणि अजित आगरकर(फोटो-सोशल मीडिया)
Ajit Agarkar’s commentary on Mohammed Shami’s allegations : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तिथे भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ५ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. अशातच आता हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. या दौऱ्यावर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून त्याने काही दिवसांपूर्वी निवडकर्त्यांवर आरोप करत निशाणा साधला होता. आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्याच्या आरोपांचे खंडन केले आहे.
हेही वाचा : विश्वचषक २०२७ मध्ये विराट आणि रोहितचे भवितव्य काय? निवडकर्त्या अजित आगरकरने दिले स्पष्ट उत्तर
अजित आगरकर शमीच्या विधानांवर भाष्य करताना एका समिटमध्ये आगरकर म्हणाले की, “जर त्यांनी मला विचारले असते तर मी त्याबाबत उत्तर दिले असते. इथे असते तर मी त्यांना नक्कीच सांगितले असते. त्यांनी सोशल मीडियावर काय म्हटले याबाबत मला माहिती नाही. जर मला माहित असते तर मी त्यांना याबाबत फोन केला असता. बहुतेक खेळाडूंसाठी माझा फोन नेहमीच चालू असतो आणि गेल्या काही महिन्यांत मी त्यांच्याशी बरेच काही बोललो आहे.”
अजित आगरकर पुढे म्हणाले की, “तो भारतासाठी एक अद्भुत कामगिरी करणारा खेळाडू असून जर त्यांनी काही सांगितले असेल तर त्यांनी कदाचित मला सांगितले असते, परंतु इंग्लंडच्या आधी देखील आम्ही म्हटले होते की जर तो तंदुरुस्त असता तर तो विमानात बसलेला असता. दुर्दैवाने, तो नव्हता.” तसेच आगरकर पुढे म्हणाले की, “आमचा देशांतर्गत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि तो तंदुरुस्त आहे की नाही ते पाहू आणि ते कसे होते त्याबाबत बघू. रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा नुकताच सुरू झाला असून काही सामन्यांमध्ये आम्हाला कळणार आहे.”
अजित आगरकर पुढे असे देखील म्हणाले की, “जर तो तंदुरुस्त असेल आणि गोलंदाजीचा दर्जा चांगला असेल तर तुम्हाला शमीसारखा गोलंदाज का नको असणार आहे? पण गेल्या ६-८ महिन्यांत आपण जे पाहत आहोत, जर तुम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समावेश केला तर जिथे आम्हाला त्याची सर्वात जास्त आवश्यकता होती, परंतु तो तंदुरुस्त नव्हता. जर तो पुढील काही महिन्यांत तंदुरुस्त झाला तर पुढची गोष्ट काय असेल हे कोणाला माहिती आहे? पण माझ्या माहितीनुसार, तो अद्याप तंदुरुस्त नाही.” असे देखील मत आगरकर यांनी व्यक्त केले आहे.