भारताचा पाकिस्तानला मोठा झटका(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : मागील महिन्यात आशिया कप २०२५ च्या (Asia cup 2025 )अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारून जेतेपद पटकावले होते भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला होता. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले. आशिया कप जिंकून देखील भारताच्या हातात अद्याप ट्रॉफी आलेली नाही. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला या स्पर्धेतून मात्र अधिकचा मोठा फायदा झाला आहे, त्यांनी १०० कोटी रुपयांची अशी भरघोस कमाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला हा मोठा धक्का मनाला जात आहे.
हेही वाचा : विश्वचषक २०२७ मध्ये विराट आणि रोहितचे भवितव्य काय? निवडकर्त्या अजित आगरकरने दिले स्पष्ट उत्तर
बीसीसीआयच्या झोळीत इतके पैसे कसे?
संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या आशिया कपने बीसीसीआयला भरीव महसूल मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. एका वृत्तानुसार, भारतीय मंडळाने आंतरराष्ट्रीय दौऱ्यातून अंदाजे १०९.०४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. बीसीसीआयला हे उत्पन्न आशिया कप होस्टिंग फी, टीव्ही हक्क आणि आयसीसी टी२०आय विश्वचषकातील सहभागातून मिळाले आहे. बीसीसीआयला मीडिया हक्कांमधून १३८.६४ कोटी रुपये मिळाले आहेत. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असून हेच सामने बीसीसीआयच्या मोठ्या कमाईचे मुख्य कारण ठरले आहे.
अहवालांनुसार, बीसीसीआयच्या २०२५-२६ च्या वार्षिक बजेटनुसार, बोर्डाला या वर्षी अंदाजे ₹६,७०० कोटी कमाई करण्याची अपेक्षा आहे. इंडियन प्रीमियर लीगचे मूल्य सलग दुसऱ्या वर्षी जरी कमी झाले असले तरी, बीसीसीआयची आर्थिक स्थिती मात्र बळकट आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या उत्पन्नात दरवर्षी वाढच होत असली तरी आयपीएलमधून बीसीसीआयचे मोठे नुकसान होत आहे. अहवालांनुसार, २०२५ मध्ये आयपीएलचे मूल्य ₹७६,१०० कोटी असण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या ₹८२,७०० कोटींपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून आले. यामुळे बीसीसीआयला अंदाजे ₹६,६०० कोटींचा फटका बसला आहे.
हेही वाचा : IND VS AUS : “जर फिट असता, तर संघात…”, मोहम्मद शमीच्या आरोपांवर अजित आगरकर बरसले..
दरम्यान, भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. आशिया कप जिंकून देखील भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या आग्रहामुळे आशिया कप ट्रॉफी एसीसी कार्यालयात बंद करण्यात आले असले तरी आशिया कपमधून बीसीसीआयच्या कामईत थोडी देखील बाधा आलेली नाही.