Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या देशासाठी….’, भारत आणि ऑस्ट्रेलियाला Rashid Khan ने दाखवला ठेंगा, नागरिकत्व नाकारले

अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू रशीद खानने आपल्या पुस्तकात खुलासा केला आहे की, त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले नागरिकत्वाचे प्रस्ताव नाकारले होते, कारण त्याला फक्त आपल्या देशासाठी खेळायचे आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 20, 2026 | 02:29 PM
राशीद खानचा गौप्यस्फोट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

राशीद खानचा गौप्यस्फोट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राशीद खानचे स्ट्रीट्स टू स्टारडम पुस्तक 
  • भारत आणि ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व नाकारले
  • काय म्हणाला राशीद खान 
अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशीद खानने त्याच्या ‘रशीद खान: फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम’ या नवीन पुस्तकात काही धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. रशीदने खुलासा केला आहे की, त्याला भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून नागरिकत्वाचे प्रस्ताव आले होते, परंतु त्याने आपल्या देशाप्रती असलेल्या निष्ठेला प्राधान्य दिले. आपल्या पुस्तकात, रशीद खानने आयपीएल २०२३ मधील एक रंजक प्रसंग सांगितला आहे. त्याने स्पष्ट केले की, भारतीय क्रिकेटमधील एका प्रमुख व्यक्तीने त्याला भारतात स्थायिक होऊन येथे क्रिकेट खेळण्याची संधी देऊ केली होती.

राशिद खानच्या घरी ‘नवा पाहुणा’! स्टार क्रिकेटरला पुत्ररत्न प्राप्त; सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

राशीद खानला मिळालेला प्रस्ताव

रशीदच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने त्याला सांगितले, “तुमच्या देशातील, अफगाणिस्तानमधील परिस्थिती खूप वाईट आहे. तुम्ही भारतात यायला हवे. आम्ही तुम्हाला भारतीय कागदपत्रे देऊ. येथेच राहा आणि येथेच क्रिकेट खेळा.” रशीदने सांगितले की हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले, पण तो हसला आणि नम्रपणे उत्तर दिले, “खूप खूप धन्यवाद, पण मी माझ्या देशासाठी, अफगाणिस्तानसाठी खेळत आहे.”

ऑस्ट्रेलियाकडूनही प्रस्ताव 

रशीद खानने खुलासा केला आहे की, त्याला केवळ भारतातूनच नव्हे, तर ऑस्ट्रेलियातूनही अशाच प्रकारच्या ऑफर्स आल्या होत्या. आपल्या पुस्तकात तो स्पष्टपणे नमूद करतो, “मला ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांकडून नागरिकत्वासाठी आणि त्यांच्या राष्ट्रीय संघांकडून खेळण्यासाठी ऑफर्स आल्या होत्या. पण मी त्यांना सांगितले की, जर मी माझ्या देशासाठी खेळू शकत नाही, तर मी दुसऱ्या कोणत्याही देशासाठी कधीही खेळणार नाही.” या २५ वर्षीय खेळाडूने हे सिद्ध केले की, त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स आणि सुरक्षित भविष्यापेक्षा त्याचा देश अधिक महत्त्वाचा होता.

जेव्हा भारतात रशीदच्या भारतीय नागरिकत्वाची मागणी निर्माण झाली

भारतीयांचे राशीद खानवरील प्रेम नवीन नाही. आपल्या पुस्तकात त्याने २०१८ मधील एका घटनेची आठवण सांगितली आहे, जेव्हा सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती. त्यावेळी, भारतीय सोशल मीडियावर “रशीद खानला भारतीय नागरिकत्व द्या” असे ट्रेंड सुरू झाले होते. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही यावर विनोदी प्रतिक्रिया दिली होती. रशीदने कबूल केले की, भारतात त्याला मिळणारा आदर त्याच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे.

पाकिस्तानच्या काबूलवरील हवाई हल्ल्याबद्दल राशिद खानने व्यक्त केले दुःख! सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

राशीद खानच्या घरात आनंदाचे वातावरण

मैदानावर आपल्या फिरकीने मोठ्या खेळाडूंना नाचायला लावणारा राशीद खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंदी आहे. त्याने वडील झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. राशीदने आपल्या मुलाचा एक खूपच गोंडस फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये एका लाकडी पाटीवर “हॅलो वर्ल्ड, माझे नाव अझलान खान आहे” असे लिहिलेले होते. रशीदने कॅप्शनमध्ये लिहिले, “अल्हम्दुलिल्लाह, माझ्या छोट्या राजकुमारा, जगात तुझे स्वागत आहे.” या बातमीनंतर जगभरातील क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Rashid khan rejected indian and australian citizenship shared in book

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Afganistan
  • IPL 2026
  • Rashid Khan

संबंधित बातम्या

Afghanistan News : तालिबानला सत्तेवर येऊन 5 वर्षे पूर्ण; काबूलमध्ये ‘व्हिक्टरी डे’चा जल्लोष, लष्करी संचलनाने शक्तिप्रदर्शन
1

Afghanistan News : तालिबानला सत्तेवर येऊन 5 वर्षे पूर्ण; काबूलमध्ये ‘व्हिक्टरी डे’चा जल्लोष, लष्करी संचलनाने शक्तिप्रदर्शन

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात
2

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral
3

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

Afghanistan Cricket : अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगीरी ; २०२७ वर्ल्ड कप मध्ये दिमाखात प्रवेश !
4

Afghanistan Cricket : अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगीरी ; २०२७ वर्ल्ड कप मध्ये दिमाखात प्रवेश !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.