R Ashwin
आर अश्विनने इंग्लंड विरुद्ध रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 4th Test) इतिहास रचला आहे. अश्विन आता भारतीय भूमीवर सर्वोत्तम भारतीय गोलंदाज बनला आहे. अश्विनने दुसऱ्या डावात सलग दोन चेंडूंत इंग्लिश संघाला दोन मोठे धक्के देत नवा विक्रम केला आहे. भारतीय ऑफस्पिनरने अनिल कुंबळेला विशेष आदराने मागे टाकले आहे.
अश्विन सर्वोत्तम गोलंदाज!
आर अश्विनने दुसऱ्या डावात सलग दोन चेंडूंत इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले. अश्विनने प्रथम बेन डकेटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारतीय भूमीवर 350 बळी पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर अश्विनने खाते न उघडता ऑली पोपला पायचीत केले. अश्विनचा फिरणारा चेंडू समजून घेण्यात पोप पूर्णपणे अपयशी ठरला आणि विकेट्ससमोर सापडला. पोप बाद झाल्याने अश्विन हा भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
अनिल कुंबळेला टाकले मागे
भारतीय भूमीवर आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने 63 सामन्यात 350 विकेट घेतल्या होत्या. 2 चेंडूत 2 गडी बाद करत अश्विन आता कुबलेच्या पुढे गेला आहे. अश्विनच्या नावावर आता भारतात एकूण 351 विकेट्स आहेत. या यादीत हरभजन सिंगचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत मायदेशात एकूण 265 विकेट्स घेतल्या आहेत.