कुलदीपमुळे जडेजाचे स्वप्नं अपूर्ण (फोटो सौजन्य - Instagram)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारताने वेस्ट इंडिजचा फक्त तीन दिवसांत एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूने धुमाकूळ घातला. तथापि, रवींद्र जडेजाने या सामन्यात एक मोठा टप्पा गाठला असता. मात्र, कुलदीप यादवमुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
अहमदाबादमधील कसोटी ही रविंद्र जडेजामुळे नक्कीच चाहत्यांच्या लक्षात राहील. मात्र त्याचे एक स्वप्नं अपूर्ण राहिले आणि कुलदीप यादव जबाबदार ठरला. आता हे स्वप्नं नक्की काय होते आणि कसे राहिले अपूर्ण जाणून घेऊया.
IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
कुलदीप यादवमुळे रवींद्र जडेजाचे स्वप्न अपूर्ण राहिले
रवींद्र जडेजाला पहिल्या डावात एकही विकेट घेता आली नाही, परंतु त्यानंतर त्याने बॅटने शानदार कामगिरी केली. रवींद्र जडेजाने १७६ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकारांसह नाबाद १०४ धावा केल्या. जडेजाच्या दमदार फलंदाजीमुळे शतक झाले. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी केली. रवींद्र जडेजाने ब्रँडन किंग, जॉन कॅम्पबेल, शाई होप आणि जोहान लायन यांना बाद करत चार विकेट घेतल्या.
तथापि, कुलदीप यादवने जेडेन सील्सला बाद करून वेस्ट इंडिजचा शेवटचा बळी घेतला. जर जडेजाने शेवटचा बळी घेतला असता तर त्याने एकाच कसोटीत एक शतक आणि एक Haul ही कामगिरी एकत्रच केली असती. ही एक मोठी कामगिरी ठरली असती आणि जडेजाच्या नावे एक कमालीचा रेकॉर्ड झाला असता.
IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
असा झाला सामना
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, भारताने पहिल्या दिवशी पहिल्या डावात कॅरेबियन संघाला १६२ धावांवर गुंडाळले. त्यानंतर भारताने शानदार फलंदाजी करत ५ बाद ४४८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडून केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. भारताने २८६ धावांची आघाडी घेतली. तथापि, भारताने वेस्ट इंडिजला १४६ धावांवर गुंडाळले आणि सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. पहिली कसोटी तीन दिवसातच भारताने गुंडाळल्यामुळे आता दुसऱ्या कसोटीसाठी चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.