
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru
WPL 2026 Points Table : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये RCB ने गुजरात जायंट्सचा एकतर्फी ३२ धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आणखी एकदा त्याच्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केले. त्याच्या या कमालीच्या कामगिरीमुळे गुणतालिकेमध्ये पहिले स्थान राखून ठेवण्यात यश मिळाले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मिळालेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातचा संघ १५० धावांवरच आटोपला. श्रेयंका पाटीलच्या फिरकी गोलंदाजीसमोर गुजरातचे फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. लॉरेन बेलनेही तीन विकेट घेतल्या. सलग तिसऱ्या विजयामुळे RCB ला पॉइंट्स टेबलमध्येही फायदा झाला आहे. पहिले तीन विकेट लवकर गमावल्यानंतर आरसीबीच्या संघासाठी रिचा घोष आणि राधा यादव यांनी कमालीची फलंदाजी केली.
Good morning, 12th Man Army. ☀️ In case you were wondering, she’s just finding us on the points table. 👆😌🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #WPL2026 pic.twitter.com/hOKIus2uWy — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 17, 2026
विजयांच्या हॅटट्रिकसह, आरसीबीने नंबर वनवरील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. तिसऱ्या सामन्यातील विजयासह, आरसीबीचे एकूण सहा गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्सने चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि फक्त एक गमावला आहे. पराभवानंतरही, गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरातचा नेट रन रेट उणे १० पर्यंत घसरला आहे. फक्त एका विजयासह दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानावर आहे, तर यूपी वॉरियर्स शेवटच्या स्थानावर आहे.
प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून १८२ धावा केल्या. संघाकडून राधा यादवने ६६ धावांची दमदार खेळी केली, तर रिचा घोषने २८ चेंडूंत ४४ धावा केल्या. राधाने शानदार फलंदाजी केली आणि ४७ चेंडूंत ६६ धावांची धमाकेदार खेळी केली. राधाने तिच्या खेळीदरम्यान ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार मारले. दरम्यान, नॅडिन डी क्लार्कने शेवटच्या षटकांत १२ चेंडूंत २६ धावा केल्या.
१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव फक्त १५० धावांतच संपला. गुजरातकडून भारती फुलमाळीने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर बेथ मुनीने २७ धावा केल्या. श्रेयंकाने ३.५ षटकांत २३ धावा देत ५ बळी घेतले, तर लॉरेन बेलने २९ धावा देत ३ बळी घेतले.