RCB Vs PBKS: Despite Punjab's defeat, Prabhsimran Singh became the 'King', equaling the 17-year-old record of 'this' former player.
RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना काल पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने पंजाबर ८ विकेट्सने पराभव केला. आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो चांगलाचा फायदेशीर ठरला. प्रथम फलंदाजी करत पंजाब संघ सर्वबाद १०१ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. प्रत्युउत्तरात आरसीबीची सुरवात चांगली झाली नसली तरी सलामीवीर फील सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरवार आरसीबीने ११ व्या षटकातच लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला आणि दिमाखात आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. पंजाब किंग्ज पराभूत झाला असला तरी या सामन्यात प्रभसिमरन सिंगने पंजाब किंग्जकडून खेळताना एक विशेष कामगिरी केली आहे. तो शॉन मार्शनंतर पंजाब किंग्जकडून अनकॅप्ड खेळाडू म्हणून ५०० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
मुल्लानपूरमध्ये पीबीकेएस आणि आरसीबी यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाबच्या प्रभसिमरन सिंगला आयपीएल २०२५ मध्ये ५०० धावा पूर्ण करण्यासाठी एका धावाची आवश्यकता होती आणि त्याने यश दयालने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धाव घेऊन ही कामगिरी करून दाखवली.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात, मार्शने पंजाब किंग्जकडून ११ सामने खेळले आणि ६१६ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या एका हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर जमा आहे. मुंबईच्या डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १४ सामन्यात ६२८ धावा केल्या होत्या.
पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जला प्रभसिमरनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, चांगली सुरुवात करून देखील तो भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर जितेश शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने १० चेंडूंचा सामना करत १८ धावा केल्या. ज्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार मारला.
हेही वाचा : IPL 2025 चा विजेत्याचं रहस्य लपलयं पॉइंट टेबलमध्ये! इतिहास पाहून व्हाल चकित
पंजाब किंग्जकडून फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठता आला. पंजाबकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक २६ धावा केल्या. स्टोइनिस व्यतिरिक्त, प्रभसिमरन सिंगने १८ आणि अझमतुल्ला उमरझाईने १८ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. परिणामी पंजाब संघ फक्त १०१ धावा करू शकला. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी तीन तर यश दयालने दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्डला प्रत्येकी एक बळी मिळाला. प्रत्युउत्तरात आरसीबीने ११ षटकात लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवत आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला.