RCB vs RR: Yashasvi Jaiswal's Bhima feat in IPL, became the only batsman in the world to set a unique record.
RCB vs RR : आयपीएल २०२५ च्या 18 व्या हंगामात आतापर्यंत ४२ सामने पार पडले आहेत. काल 42 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 205 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात आरआरला 194 धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सची पराभवाची मालिकाच सुरू आहे. असे असताना संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने एक विशेष कामगिरी करून दाखवली आहे. यशस्वीने आयपीएल सामन्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम तीन वेळा केला आहे.
यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात करताना तीन वेळा पहिल्याच चेंडूवर षटकार मारून विक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएल सामन्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकूण आठ फलंदाजांकडून षटकार ठोकण्यात आला आहे. परंतु २३ वर्षीय जयस्वाल हा पराक्रम तीन वेळा करून एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
हेही वाचा : RCB vs RR : जोश हेझलवुड ठरला आजच्या सामन्याचा हिरो! राजस्थानला बंगळुरूने 11 धावांनी केलं पराभूत
गुरुवारी झालेल्या 42 व्या सामन्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जयस्वालने रियान परागच्या नेतृत्वाखालील संघाकडून डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने आपला डाव सुरू केला.
आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स) -३
नमन ओझा (राजस्थान रॉयल्स) -१
मयंक अग्रवाल -१
सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) -१
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) -१
रॉबिन उथप्पा -१
फिल साल्ट (कोलकाता नाईट रायडर्स)- १
प्रियांश आर्य (पंजाब किंग्ज)- १
राजस्थान रॉयल्सची कामगिरी जरी निराशाजनक असली तरी जयस्वाल मात्र उत्तम फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल २०२५ सामन्यांमध्ये त्याने चार अर्धशतकांसह ३०७ धावा चोपल्या आहेत.
काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.