फोटो सौजन्य : SunRisers Hyderabad/Royal Challengers Bengaluru
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद टाॅस अपडेट : आज आयपीएल 2025 चा 65 वा सामना एकाना क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. आजचा सामना हा बंगळुरुच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पहिल्या स्थानावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करेल.
आजच्या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. मागिल सामना हा बंगळुरुचा कोलकता नाइट राइडर्सविरुद्ध आयोजित करण्यात आला होता, पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होत. विराट कोहलीने त्याच्या निवृतीनंतर तो मैदानात दिसला नाही त्यामुळे चाहते आता त्याला रिटायरमेंटनंतर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
ENG vs ZIM : पहिल्याच कसोटीत इंग्लडच्या 3 खेळाडूंनी ठोकले शतक! वाचा सामन्याचा अहवाल
रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुचा मूळ कर्णधार रजत पाटीदार हा दुखापतीमुळे संघाचे नेतृत्व करणार नाही. त्याच्या जागेवर आज जितेश शर्मा हा कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर रजत पाटीदार हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील करण्यात आले आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर ट्रॅव्हिस हेड याचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी दुखापती मधून सावरत आहे तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील झाला आहे पण त्याला आज खेळण्याची संधी मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
🚨 Toss 🚨@RCBTweets won the toss and elected to bowl against @SunRisers in Lucknow.
Updates ▶️ https://t.co/sJ6dOP9ung#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/8IFxI9fEqa
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (कर्णधार/यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कुणाल पंड्या, रोमेरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, यश दयाल, लुंगी एनगिडी
इम्पॅक्ट प्लेअर – रजत पाटीदार, रसिक द्वार, मनोज भांडगे,जेकब बेथल, स्वप्नील सिंह
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा
इम्पॅक्ट प्लेअर – मोहम्मद शमी, हर्ष दुबे, सचिन बेबी, जीशान अन्सारी, सिमरजीत सिंह