फोटो सौजन्य -Zimbabwe Cricket
इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे पहिला कसोटी सामना : इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू झाली आहे. कालपासून म्हणजेच 22 मे पासून या मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतकीय खेळी खेळली आहे. इंग्लंडने हा डाव सहा विकेट्स गमावून 565 धावांवर थांबवला आहे. या पहिल्या डावामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली याने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यांमध्ये 171 चेंडूंमध्ये 124 धावा केल्या यामध्ये 14 चौकारांचा समावेश होता. तर इंग्लंडला दुसरा सलामी वीर फलंदाज बेन डकेट याने देखील कमालीची कामगिरी केली. त्याने 140 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने दोन षटकार आणि वीस चौकार मारले. पहिला विकेट गेल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी शतक मारल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ऑली पॉप याने देखील शतकीय खेळी खेळी खेळली. त्याने 171 धावा केल्या यामध्ये दोन षटकार आणि 24 चौकार मारले त्याचबरोबर 103 च्या स्ट्राइक रेटने त्याने फलंदाजी केली.
ICC ने केली WTC फायनलसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा! दिसणार भारतीय दोन अनुभवी पंच
कसोटीचा स्टार जय रूट याने 34 धावांची खेळी खेळली तर हॅरि ब्रुक याने अर्धशतक झळकावले त्यात त्याने तीन षटकार आणि सहा चौकार मारले. कर्णधार बेन स्टॉक्स मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने नऊ धावा खेळल्या आणि त्यानंतर डाव संपवण्यात आला. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावांमध्ये सहा विकेट्स कमावल्यानंतर 565 धावांवर खेळ थांबवला आहे त्याचबरोबर डाव डिक्लेअर केला आहे.
Second wicket for Blessing Muzarabani as Ben Stokes departs for 9.
England are 548/5
Ball-by-ball 📝: https://t.co/cojkDo7BCj#ENGvZIM #ExperienceZimbabwe pic.twitter.com/Rpbmfl94V5
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) May 23, 2025
पहिल्या डावामध्ये झिम्बाब्वेच्या गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर मुजराबानीला आशीर्वाद याने पहिल्या कसोटी सामन्यात 3 विकेट्स नावावर केले. यामध्ये त्याने जो रुट, हॅरि ब्रुक आणि बेन स्टोक यांना आऊट केले. वेस्ली मधवेरे याने संघाला एक विकेट मिळवुन दिला, सिकंदर रझा आणि तनाका चिवांगा या दोघांनीहि संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवुन दिली. आज पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस सुरु आहे, यामध्ये आता झिम्बाब्वेचा संघ फलंदाजी करत आहे. यामध्ये 15 ओव्हरमध्ये झिम्बाब्वेच्या संघाने 1 विकेट गमावुन 73 धावा केल्या आहेत.