फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रिषभ पंत : आयपीएल २०२५ च्या चर्चाना उधाण आलं आहे, भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज रिषभ पंतने ट्विट केले होते आणि सोशल मीडियावर कॉमेंट्सचा वर्षाव झाला होता. अलीकडेच, ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनातील मतभेदाच्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीने ऋषभ पंतला कायम ठेवण्याच्या यादीतून बाहेर ठेवले आहे. संघाने अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु अद्याप या यादीची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, आता इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. असे सांगण्यात आले आहे की दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरवर दिल्ली संघाची नजर असेल.
टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, ऋषभ पंतने केवळ दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडे कर्णधारपदाची मागणी केली नाही तर कोचिंग स्टाफच्या निवड प्रक्रिये संदर्भात त्याला हातभार लावायचा होता. पण दिल्ली संघाचे व्यवस्थापन पंतच्या कामगिरीवर आणि कर्णधारपदावर खूश नाही. त्यामुळे संघाने पंतला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिषभ पंतच्या सुटकेचा निर्णय एका रात्रीत घेण्यात आलेला नसून, हे मतभेद अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
हेदेखील वाचा – IND vs NZ : तिसऱ्या सामन्यासाठी भारताचा संघ सज्ज! गंभीरने गाळला खेळाडूंचा घाम
दिल्ली कॅपिटल्स संघात ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे कर्णधाराची जागा रिकामी होणार आहे. संघाकडे अक्षर पटेलचा कर्णधार म्हणून पर्याय आहे, परंतु व्यवस्थापन देखील श्रेयस अय्यरमध्ये स्वारस्य दाखवत आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली KKR आयपीएल 2024 चे चॅम्पियन बनले. सूत्राने सांगितले की, “अक्षर पटेल संघाचे कर्णधारपद भूषवू शकतो, परंतु मेगा लिलावात दिल्ली निश्चितपणे कर्णधारपदाचे इतर पर्याय शोधेल. डीसी निश्चितपणे श्रेयस अय्यरला लक्ष्य करेल कारण त्याला दिल्लीकडून भरपूर यश मिळाले होते आणि तो संघाच्या सेटमध्ये मदत करेल- या नावांभोवती एक मजबूत संघ तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूंना फ्रँचायझी रिटेल करेल आणि कोणत्या खेळाडूंना संघ रिलीज करणार यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहे. आज आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासंदर्भात लाईव्ह स्ट्रीमिंग jio Cinema वर क्रिकेट प्रेमींना पाहता येणार आहे. मागील सीझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून मोठा राडा पाहायला मिळाला. यामध्ये आता मोठे बदल होऊ शकतात. त्याचबरोबर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स कायम ठेवणार की रिलीज करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. त्याचबरोबर युझवेन्द्र चहलला भारतीय संघामध्ये बऱ्याच काळापासून वगळण्यात आले होते. त्यामुळे तो कोणत्या संघामध्ये असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण संघामध्ये स्थान न मिळाल्यामुळे तो बाहेर देशामधील लीग खेळत होता.