Rishi Sunak’s comments on Bumrah and Anderson : माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे क्रिकेटप्रेम सर्व परिचित आहे. ते खूप वेळा क्रिकेटबद्दल आपले मत व्यक्त करतात किंवा कधी कधी ते सामने बघायला स्टेडियमवर देखील दिसून येतात. अशातच आता त्यांना एका वर्ल्ड समिट २०२५ मध्ये विचारण्यात आले की जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यापैकी कोण सर्वोत्तम आहे? यावर ऋषी सुनक यांनी आपले उत्तर नेमके काय दिले याबाबत आपण जाणून घेऊया.
ऋषी सुनक यांना जसप्रीत बूमराह की जेम्स अँडरसन यांच्यापैकी सर्वोत्तम कोण याबाबत प्रश्न करण्यात आला. यावर ऋषी सुनक यांनी उत्तर दिले. ऋषी सुनक म्हणाले की, जेम्स अँडरसन हा क्रिकेटमधील सर्वात महान गोलंदाज असून जरी लोक फलंदाजांना प्राधान्य देत असले तरी , तरी अँडरसनची २० वर्षांची कारकीर्द आहे आणि तो खूप प्रेरणादायी खेळाडू आहे. सुनक यांना जिमी अँडरसन आणि जसप्रीत बुमराह यांच्यापैकी एक निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी बुमराहबाबत बोलताना त्याचे वर्णन “हुशार” असे केले आहे, परंतु त्यांच्या वचनबद्धता आणि नम्रतेसाठी त्यांनी इंग्लंडच्या दिग्गज वेगवान गोलंदाजाला पसंती दिली. ऋषी सुनक पुढे म्हणाले की, “बुमराह हुशार आहे, परंतु सर जिमी अँडरसन माझी निवड असणार आहे.”
हेही वाचा : Ranji Trophy 2025 : भारतीय संघाने वेळोवेळी नाकार! आता कर्णधार होताच रजत पाटीदारने द्विशतक झळकवून दिला इशारा
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने ५० सामन्यांमध्ये ७४ डावात २२६ बळी टिपले आहेत. जसप्रीत बुमराहची सरासरी १९.८३ आहे, तर त्याची इकॉनॉमी २.७८ इतकी आहे. बुमराहने आतापर्यंत १५ वेळा पाच बळी घेण्याची किमया केली आहे. अनेक दिग्गजांकडून बुमराहला सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून वर्णन करण्यात आले आहे.
इंग्लंडचा माजी स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून १८८ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २६.४६ च्या सरासरीने आणि २.७९ च्या इकॉनॉमीने ७०४ बळी टिपले आहेत. जेम्स अँडरसन हे क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज असून अँडरसनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३२ वेळा पाच बळी आणि तीन वेळा दहा बळी घेण्याची किमया साधली आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर