Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 

दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात पश्चिम विभाग आणि मध्य विभाग हे दोन संघ आमनेसामने आहेत. पश्चिम विभागाकडून ऋतुराज गायकवाडने दमदार शतक झळकावले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 04, 2025 | 03:42 PM
Rituraj Gaikwad's century in Duleep Trophy! A big warning to Team India; West Zone in strong position

Rituraj Gaikwad's century in Duleep Trophy! A big warning to Team India; West Zone in strong position

Follow Us
Close
Follow Us:

West Division vs. Central Division : बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा असणाऱ्या दुलीप ट्रॉफीचा थरार सध्या सुरू आहे. दुलीप ट्रॉफीचा उपांत्य सामना पश्चिम विभाग आणि मध्य विभाग यांच्यात खेळवला जात आहे. महाराष्ट्राचा कर्णधार आणि पश्चिम विभागाचा विश्वासू खेळाडू असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने मध्य विभागाविरुद्ध दमंदार कामगिरी करत शतक झळकवले आहे. या शतकाने त्याने आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

हेही वाचा : IND vs PAK: Asia cup मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला! १३ वर्षांच्या इतिहासाला कलाटणी मिळेल?

पश्चिम विभागाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. परंतु, ऋतुराज गायकवाडने मधल्या फळीत संघाची सूत्रे हाती घेतली आणि शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत, गायकवाडने १५७ चेंडूंचा सामना केला करत नाबाद १२१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १६ चौकार मारले आहेत. चहापानाच्या वेळेपर्यंत, पश्चिम विभागाने ५८ षटकांत ५ गडी गमावून २३७ धावा उभारल्या आहेत.

गायकवाडने डाव सांभाळला

चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या गायकवाडने आर्य देसाईसोबत ८२ धावांची मोठी भागीदारी रचली. यादरम्यान, आर्य ३९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर गायकवाडने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक टोक लावून धरले. त्याच वेळी, त्याने श्रेयस अय्यरसोबत ४५ धावांची भागीदारी देखील केली, परंतु, अय्यर २५ धावा काढून आऊट झाला. त्यानंतर शम्स मुलानी आणि तनुश कोटियन यांनी खेळ पुढे नेला. यादरम्यान गायकवाडने आपले शतक पूर्ण केले.

गायकवाडचे प्रथम श्रेणीतील ८ वे शतक झळकवले..

गायकवाडने आपल्या शतकासह, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८ वे शतक पूर्ण केले आहे. त्याच्या नावावर १४ अर्धशतके जमा आहेत. ३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, गायकवाडने ४१ पेक्षा जास्त सरासरीने २७०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. गायकवाडने अद्याप भारताकडून  एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच वेळी, त्याने भारताकडून ६ एकदिवसीय आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा : Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!

पश्चिम विभागाची सुरुवातीला मोठे धक्के

बेंगळुरूमधील बीसीसीआय सीओई ग्राउंड-२ वर खेळवण्यात असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात, पश्चिम विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो चांगलाच फसला.  संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी फक्त १० धावांवरच आपल्या  दोन विकेट गमावल्या. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सांभाळला. यशस्वी जयस्वाल ४ धावा काढून माघारी परतला आणि हार्विक देसाई १ धाव काढून बाद झाला. सेंट्रल झोनकडून खलील अहमदने २ विकेट चटकावल्या. त्याच्याशिवाय हर्ष दुबेने १, सरांश जैनने १ आणि दीपक चहरने १ विकेट घेतली.

Web Title: Rituraj gaikwad scored a century for west zone in the duleep trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Duleep Trophy 2025
  • Ruturaj Gaikwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.