भारत वि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेला हा आशिया कप यावेळी टी २० स्वरूपात खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दोन आठवड्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. १० सप्टेंबरल यूएई विरुद्ध सामना खेळून भारत या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर १४ सप्टेंबररोजी पाकिस्तानविरुद्ध भारताचा दूसरा सामना असणार आहे. हा सामना चांगलाच रोमांचक होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. अशातच भारत-पाकिस्तान सामन्यात यावेळी १३ वर्षाचा विक्रम मोडला जणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. याबद्दल आयपण जाणून घेऊया.
हेही वाचा : शिखर धवन ईडीच्या रडारवर, बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात ‘गब्बर’ची चौकशी होणार
आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याकडे नजरा लावून बसले आहेत. दोन्ही देशांमधील टी-२० फॉरमॅटमध्ये १३ वर्ष जुना विक्रम यावेळी मोडला जाणार का? हे पाहणे रंजक असणार आहे.
टी-२० फॉरमॅटमध्ये एका डावात २०० धावा करणे ही खूप मोठी गोष्ट आता राहिली नाही. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, आपण अनेकदा २०० धावा झालेल्या आहेत. तसेच त्यांचा पाठलाग केला जाणे आणि सहज तो आकडा गाठला जातो. परंतु, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या टी-२० सामन्यांमध्ये, कोणत्याच संघाला एका डावात २०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
सर्वाधिक एकूण धावसंख्येचा विक्रम भारताच्या नावावर जमा आहे. २०१२ मध्ये अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ५ विकेट गमावून १९२ धावा केल्या होत्या. दोन्ही देशांमधील टी-२० मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
आशिया कपमध्ये, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर, आणखी दोन सामने होण्याची शक्यता आहे. खरंतर, ग्रुप अ मधील दोन अव्वल संघांमधील सामना २१ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. जर कोणताही मोठा अपसेट झाला नाही, तर २१ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येणे जवळजवळ निश्चित आहे. त्याच वेळी, तिसरा सामना अंतिम फेरीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, भारत १९२ धावांचा सर्वोच्च धावसंख्येला मागे टाकून २०० धावांचा टप्पा पार करतो का? हे पाहणे रंजक असणार आहे. त्याच वेळी, पाकिस्तानच्या फलंदाजीवर देखील लक्ष्य असणार आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये फक्त १३ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये, भारतीय संघ १० सामन्यांमध्ये जिंकण्यात यशस्वी झाला आहे. तर पाकिस्तानने ३ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा : आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती! कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक