रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) ३६ वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे पूर्व अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहे. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. १८ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार अशा पाच पदांसाठी निवडणुक पारपडत आहे.
रॉजर बिन्नी यांची कारकीर्द :
अष्टपैलू रॉजर बिन्नीनं १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं २७ कसोटी सामन्यात ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. रॉजर बिन्नीनं कसोटीत ११ तर एकदिवसीय सामन्यात १२ झेल घेतले आहेत. रॉजर बिन्नीनं २७ कसोटीमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ७७ विकेट्स मिळवल्या आहेत. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी महत्वाचा भाग होता. या विश्वचषकात रॉजर बिन्नीनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.