
BCCI Central Contracts 2026: 'Ro-Ko' to remain unchanged! Setback for Shami; these players will get a place in the BCCI contract list.
BCCI Central Contracts 2026 : बीसीसीआयकडून 2026 चा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंसाठी या करारात काही धक्के बसण्याची शक्यता आहे. या करारामध्ये काही दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही युवा खेळाडूंना मोठं प्रमोशन मिळेल असल्याची चर्चा आहे. यामध्ये सर्वात चर्चेचा मुद्दा अ ह तो म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा या करारात कायम राहणार आहेत. दोघांची श्रेणी अजूनही आतापर्यंत A+ ग्रेडमध्ये आहेत. परंतु, 2026 च्या केंद्रीय करारामध्ये या अनुभवी खेळाडूंना A ग्रेडमध्ये खाली आणले जाण्याची शक्यता आहे.
तसेच सध्याच्या फॉर्म बघता जसप्रीत बुमराह, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांना A+ ग्रेडमध्ये बढती मिळू शकते. तसेच या व्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंना B ग्रेडमध्ये कायम ठेवण्यात येऊ शकते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणारा देवदत्त पडिक्कल देखील यावेळी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग असण्याची शक्यता आहे. परंतु, यावेळी मोहम्मद शमीला मोठा धक्का बसू शकतो.
हेही वाचा : IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध ‘किंग’ कोहलीला नामी संधी! विराट तोडणार कुमार संगकाराचा ‘तो’ विक्रम
2025 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट A+ ग्रेडमधील खेळाडू
1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमधील करारानुसार टी20 मधून निवृत्त असून देखील बीसीसीआयने कोहली आणि रोहित यांना A+ ग्रेडमध्ये कायम राखले होते. साधारणपणे या ग्रेडमध्ये तीनही फॉर्मेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंनाच स्थान देण्यात येते. मागच्या करारात A+ ग्रेडमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह हे चार खेळाडू होते. यापैकी आता बुमराह तीनही फॉर्मेटमध्ये सक्रिय आहे. तर जडेजाने टी20 मधून निवृत्ती पत्करली आहे.
संभाव्य बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 2026
A+ ग्रेड – वार्षिक ₹7 कोटी – जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, शुभमन गिल
A ग्रेड – वार्षिक ₹5 कोटी – विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर,
B ग्रेड – वार्षिक ₹3 कोटी – ध्रुव जुरेल, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, तिलक वर्मा, ईशान किशन.
C ग्रेड – वार्षिक ₹1 कोटी – शिवम दुबे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, रजत पाटीदार, प्रसिद्ध कृष्णा, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, हर्षित राणा.
हेही वाचा : Vijay Hazare Trophy 2025 : रिंकू सिंग एक्सप्रेस सुसाट! 38 कर्णधारांना दिला धोबीपछाड; केली नंबर 1 कामगिरी