फोटो सौजन्य: @deepu_drops (X.com)
रोहित शर्मा, भारतीय क्रिकेट संघातील एक असे नाव ज्याच्यावर आज कोटी क्रिकेटप्रेमी प्रेम करतात. रोहितने आपले कौशल्य विविध मॅचेसमध्ये दाखवले आहे. मग ते ODI असो, T20 असो की टेस्ट क्रिकेट. पण आज हिटमॅनने टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्माने 2013 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि 2019 मध्ये ते टीम इंडियाचे ओपनर बनले. त्यानंतर हिटमॅन संघात कायमचे स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. 2022 मध्ये तर त्याने टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा दिग्गज ओपनर आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार असलेल्या रोहितने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने बुधवार, ७ मे रोजी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे लॉंग फॉरमॅटच्या क्रिकेटला निरोप दिला. रोहितच्या निवृत्तीची बातमी अशा वेळी आली, जेव्हा सिलेक्शन कमिटीने त्याला टेस्ट टीमच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच इंग्लंड दौऱ्यावर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता देखील कमी दिसत होती.
रोहितने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये दिसते की त्याने त्याच्या 280 क्रमांकाच्या टेस्ट कॅपचा फोटो पोस्ट केला. यासोबतच त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या कपड्यांमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. इतक्या वर्षांपासून तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.” पण, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहितने स्पष्ट केले की तो सध्या वन डे फॉरमॅटमध्ये खेळत राहील. तो म्हणाला, “मी ODI फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन.”