गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : रोहित शर्मा आणि विराट कोहली जोपर्यंत चांगली कामगिरी करत आहेत तोपर्यंत त्यांना भारतीय संघाचा भाग असले पाहिजे, असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मंगळवारी सांगितले. तथापि, इंग्लंडच्या आगामी कसोटी दौऱ्यासाठी या दोन वरिष्ठ फलंदाजांची निवड करावी की नाही हे ठरवण्यात त्यांची कोणतीही भूमिका राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. इंग्लंडमध्ये कसोटी कर्णधार म्हणून रोहितच्या भविष्याबद्दल अटकळ आहे. कोहलीबद्दल फारशी चर्चा नाहीये पण त्याच्या भविष्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा : IPL 2025 : खराब लिलाव धोरण CSK च्या आले अंगलट! बदलत्या टी-२० शैलीनुसार संघ तयार करण्यात फ्लॉप..
‘इंडिया अॅट २०४७’ शिखर परिषदेत बोलताना गंभीरने वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्यावर भाष्य करणे टाळण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम, प्रशिक्षकाचे काम संघ निवडणे नाही. हे निवडकर्त्यांचे काम आहे. प्रशिक्षक फक्त सामना खेळणाऱ्या ११ खेळाडूंची निवड करतात. मी निवड समिती नाही. जोपर्यंत ते (रोहित आणि कोहली) चांगले प्रदर्शन करतात तोपर्यंत ते संघात असले पाहिजे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी काही माजी स्टार कसोटी खेळाडूंवर टीका केली आहे आणि त्यांच्यावर भारतीय क्रिकेटला त्यांची वैयक्तिक जहागिरी म्हणून मानत असल्याचा आरोप केला. गंभीरने नावे घेतली नाही पण त्याने असे संकेत दिले की त्याच्या रागाचे लक्ष्य मुंबई इंडियन्सचे दोन माजी कर्णधार होते जे त्याच्या खेळण्याच्या दिवसांपासून त्याच्यावर टीका करत आहेत. मी हे काम ८ महिन्यांपासून करत आहे. जर निकाल मिळाले नाहीत तर टीकेची काहीच हरकत नाही. टीका करणे हे लोकांचे काम आहे. काही असे आहेत जे २५ वर्षांपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसले आहेत आणि त्यांना वाटते की भारतीय क्रिकेट ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे. त्यानी जोर देऊन सांगितले, भारतीय क्रिकेट ही कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही तर ती १४० कोटी भारतीयांची मालमत्ता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मंगळवारी आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांसह कोणत्याही व्यासपीठावर पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली. सीमापार दहशतवाद संपेपर्यंत भारतीय संघाने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यासोबत खेळू नये. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे भारताने २००७ पासून पाकिस्तानविरुद्ध पूर्ण मालिका खेळलेली नाही. गंभीर म्हणाला की ते फक्त बहु-संघ स्पर्धामध्ये एकमेकांशी खेळतात आणि ते देखील थांबवले पाहिजे