Rohit Sharma Birthday Special: Do you know these six records of Badde Boy Rohit Sharma? Which every cricketer would like to have..
रोहित शर्माने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द २००७ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून सुरू केली होती. त्यानंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये देखील पदार्पण केले. रोहित शर्माने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून पहिल्या आयपीएल हंगामात पदार्पण केले होते. त्यानंतर तो मुंबई इंडियन्ससोबत जोडला गेला. जिथे त्याने संघाचे नेतृत्व करत संघाला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.
रोहित शर्माणने हा एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके थोकणारा एकमेव फलंदाज आहे. रोहितने २०१३ मध्ये बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा करत पहिले द्विशतक झळकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने २६४ धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा २०१७ मध्ये त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढत २०८ धावांची नाबाद खेळी केली होती.
2019 चा विश्वचषक भारतीय संघाठी जरी ठीक राहिला नसला तरी रोहित शर्मासाठी मात्र खूप चांगला होता. त्यावेळी रोहित शर्मा उत्तम कामगिरी करत होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122 धावा करत स्पर्धेची चांगली सुरवात केली होती. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57, पाकिस्तानविरुद्ध 140, त्यानंतर त्याने इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध लागोपाठ तीन शतके झळकावली होती. रोहितने या विश्वचषकात एकूण 5 शतके ठोकली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा खरा सिक्सर किंग आहे. त्याच्या खात्यावर सर्वाधिक षटकार आहेत. त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला देखील मागे सोडले आहे. रोहितने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषका दरम्यान हा विक्रम केला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 637 षटकार ठोकले आहेत. तर ख्रिस गेलने 553 षटकार लगावले आहेत.
रोहित शर्मा आणि शाकिब अल हसन हे दोन असे खेळाडू आहेत, ज्यांनी टी-२० विश्वचषकाच्या सर्व आवृत्त्या खेळल्या आहेत. रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 सामने खेळले आहेत. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. आताच्या घडीला आयर्लंडचा पॉल स्टर्लिंगने 145 सामने खेळले आहे, तो रोहितचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माने अजून एक कारनामा केला आहे. त्याने टी-२० मध्ये सर्वाधिक पाच शतके लगावली आहेत आणि या फॉरमॅटमध्ये पाच शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने २०१५ मध्ये धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०६, २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ११८, २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद १०० आणि त्याच वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या.