फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
रोहित शर्मा आणि वैभव सूर्यवंशी व्हिडीओ : भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने कालच्या सामन्यांमध्ये संघासाठी तिसरे शतक झळकावले. रोहित शर्मा सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने या सीझनमध्ये सुरुवातीच्या सामन्यात खराब कामगिरी केली होती त्यानंतर त्याने त्याचा फॉर्म पुन्हा मिळवला आहे आणि संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावले होते त्यानंतर त्याचे संपूर्ण देशभरामध्ये कौतुकाचा वर्षाव केला होता. सध्या रोहित शर्मा आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या मेगा लिलावापासून राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. त्याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि एक तुफानी खेळी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध, या १४ वर्षीय फलंदाजाने ३५ चेंडूत शतक झळकावले. तथापि, तो त्याचा उत्कृष्ट फॉर्म राखू शकला नाही. गुरुवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वैभवला खातेही उघडता आले नाही. वैभवने २ चेंडूंचा सामना केला आणि मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. दीपक चहरने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. या सामन्यात मुंबईने राजस्थानचा १०० धावांनी पराभव केला. या पराभवामुळे राजस्थान आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
Rohit Sharma appreciating Vaibhav Suryavanshi after the match win last night.❤️
The true leader @ImRo45 🐐 pic.twitter.com/zL5pfx3avT
— Ravi 🧡🧡 (@ravi95094) May 2, 2025
सामना संपल्यानंतर, रोहित शर्माने शून्यावर बाद झालेल्या वैभव सुयवंशीला प्रोत्साहन दिले. सामन्यानंतर जेव्हा दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले तेव्हा रोहित वैभवकडे गेला आणि त्या तरुण खेळाडूला प्रोत्साहन देणारे काहीतरी बोलला. रवी शास्त्री यांनी ऑन एअर सांगितले, “तो शिकेल. रोहित शर्मानेही काही प्रोत्साहनदायक शब्द सांगितले,” तरुण स्टारसाठी रोहितच्या हावभावाने अनेकांची मने जिंकली. दोघांचेही हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Rohit Sharma encouraging Vaibhav Suryavanshi ❤️
– A lovely gesture by Indian Captain. pic.twitter.com/QHjcCNWkUA
— Johns. (@CricCrazyJohns) May 1, 2025
आयपीएल २०२५ मधील वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत आणि ४ डावांमध्ये १५१ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे वैभवला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. लखनौविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीचे खूप कौतुक झाले.