फोटो सौजन्य : IndianPremierLeague
मुंबई इंडियन्सच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटनच्या संघाला पराभूत करून क्वालिफायर दोन च्या सामन्यात एन्ट्री केली आहे. कालच्या सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने विशेषतः फलंदाजाने कमालीची कामगिरी केली. यामध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी खेळली. कालच्या सामन्यात रोहित शर्मा ने गुजरात टायटन्स विरुद्ध 81 धावांची खेळी खेळली. मुंबईच्या संघासाठी एलिमिनेटर सामन्यात रोहित शर्मा आणि 50 चेंडूंमध्ये 81 धावा केल्या यामध्ये त्याने चार षटकार आणि नऊ चौकार मारले. त्याचबरोबर रोहित शर्माने 162 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी कालच्या सामन्यात केली.
आता रोहित शर्माने त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. त्याच्या खेळीमुळे एमआयने २२८/५ असा मोठा धावसंख्या उभारला. प्रत्युत्तरात, जीटीला सहा विकेट गमावून फक्त २०८ धावा करता आल्या आणि एमआयने क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. ‘हिटमॅन’ रोहितला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेऑफ ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एलिमिनेटरमध्ये रोहितने एक-दोन नव्हे तर ५ नवे विक्रम केले.
1 – आता हिटमॅनने म्हणजेच रोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासामध्ये प्लेऑफमध्ये अधिक धावा करणारा सर्वात वयस्कर क्रिकेट खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या ३८ वर्षे आणि ३० दिवसांत हे यश मिळवले. त्याने मायकेल हसीला याचा विक्रम मोडला. २०१३ मध्ये आयपीएल क्वालिफायर १ मध्ये हसीने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ८६ धावा केल्या होत्या. त्यावेळी हसीचे वय ३७ वर्षे ३५९ दिवस होते.
2 – रोहित शर्माने आयपीएलमध्ये २७१ सामन्यात ३०२ षटकार मारले आहेत. तो आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने आयपीएलमध्ये १४२ सामन्यात ३५७ षटकार मारले.
हार्दिक पांड्यासोबतच्या भांडणावर शुभमन गिलने मौन सोडले, टीकाकारांना दिले चोख उत्तर
3 – रोहित हा प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू आहे. या बाबतीत त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध क्वालिफायर १ मध्ये सूर्याने नाबाद ७१ धावा केल्या. त्याने ५४ चेंडूंचा सामना केल्यानंतर १० चौकार मारले.
4 – इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्लेऑफमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा रोहित शर्मा हा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू कालच्या सामन्यानंतर ठरला आहे. हा एकूण विक्रम माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कुंबळेला प्लेऑफमध्ये ३८ वर्षे आणि २१९ दिवसांच्या वयात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
5 – टी-२० क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने मुंबईसाठी २३५ सामन्यांमध्ये २६७ षटकार मारले आहेत. या ‘हिटमॅन’ने ख्रिस गेलला मागे टाकले आहे, ज्याने आरसीबीसाठी ९१ सामन्यात २६३ षटकार मारले होते.